JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / जिममध्ये व्यायाम करताना खाली कोसळला कॉन्स्टेबल, जागीच मृत्यू पाहा VIDEO

जिममध्ये व्यायाम करताना खाली कोसळला कॉन्स्टेबल, जागीच मृत्यू पाहा VIDEO

24 वर्षीय कॉन्स्टेबल विशाल जिममध्ये व्यायाम करत होता. व्यायाम करताना अचानक खाली कोसळला आणि काही वेळाने त्याचा मृत्यू झाला.

जाहिरात

व्यायाम करताना मृत्यू

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 20 जुलै : डान्स करताना किंवा काम करताना अचानक हार्ट अॅटॅक आल्याचे अनेक प्रकरण समोर आली आहेत. मात्र आता जिममध्ये व्यायाम करताना तरुणाचा अचानक मृत्यू झाला आहे. हैदराबादमध्ये एका जिममध्ये व्यायाम करत असताना हार्ट अॅटॅक आल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. आसिफ नगर पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबलचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय कॉन्स्टेबल विशाल जिममध्ये व्यायाम करत होता. व्यायाम करताना अचानक खाली कोसळला आणि काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली असून, विशालला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

‘ही’ आहेत हार्ट अटॅकची 6 मोठी कारणं! दुर्लक्ष टाळा, वाचा डॉक्टरांचा खास सल्ला

कॉन्स्टेबल विशालने 2020 च्या बॅचमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कामावर रुजू झाला होता. तो आसिफ नगर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. विशाल सध्या बोईनपल्ली येथे राहत होता. ही संपूर्ण घटना जिममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ECG, Blood testची गरजच नाही; हे मशीन फक्त 5 मिनिटांत सांगेल तुम्हाला हार्ट अटॅकचा किती धोका हार्ट अॅटॅक येण्याची काय आहेत कारण? जास्त ताण घेणे हे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहे. पुरेशी झोप न मिळाल्यानेही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. आजचे तरुण हे सकस आहार घेत नाहीत. तरुणांमध्ये फास्ट फूडचे सेवन झपाट्याने वाढले आहे. हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमुख कारण आनुवंशिकता आहे. अलीकडच्या काळात असे दिसून आले आहे की, रोज व्यायाम करणारी तंदुरुस्त लोक देखील हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडत आहेत. असे अनेक रोग आहेत, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. मधुमेह, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आदी आजारांमुळेही हृदयविकाराचा झटका येतो. अति धूम्रपानामुळेही हृदयविकाराचा झटका येतो.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या