JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Yuck! पाहताच उलटी येईल पण म्हणे लागते टेस्टी; चक्क माशांच्या आतड्यांपासूनच बनवली जाते विचित्र डिश

Yuck! पाहताच उलटी येईल पण म्हणे लागते टेस्टी; चक्क माशांच्या आतड्यांपासूनच बनवली जाते विचित्र डिश

माशांच्या आतड्यांपासून बनवलेले जाणारे हे पदार्थ खाणं दूर तुम्ही पाहूही शकत नाही.

जाहिरात

(फोटो - Instagram/@gabenyblad)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

तैपई, 13 ऑक्टोबर : जगातील प्रत्येक देशाची एक खास खाद्य संस्कृती (Food Culture) आहे. त्यानुसार तेथे पदार्थ तयार केले जातात. मात्र  जगभरातील काही डिशेस (Dishes) या दिसायला इतक्या किळसवाण्या असतात, की त्यातील अन्नपदार्थ (Food) खाणं दूर आपण पाहूही शकत नाही. मात्र असे विचित्र पदार्थ आवडीनं खाणाऱ्यांच्या संख्या काही कमी नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका पदार्थाविषयी सांगणार आहोत की जो माशांपासून तयार केला जातो. तुम्ही म्हणाल मासे (Fish) हा अगदी सामान्य सी फूडचा (Sea Food) प्रकार आहे आणि सी फूड जगात सर्वत्र खाल्लं जातं मग हा पदार्थ विचित्र कसा? परंतु आम्ही तुम्हाला ज्या पदार्थाविषयी सांगणार आहोत, तो पदार्थ माशांच्या आतड्यापासून (Fish Intestine) तयार केला जातो. तैवानमधील (Taiwan) अनेक पदार्थ जगप्रसिद्ध आहेत. लोक अगदी चवीनं या पदार्थांचा आस्वाद घेतात. तैवानमधील अशाच डिशपैकी ही एक डिश आहे, जी माशांच्या आतड्यांपासून तयार केली जाते. ही डिश दिसायलाच इतकी किळसवाणी असते की ती पाहताच एखादा उलटी करेल. मात्र ही डिश खूप चविष्ट असल्याचा दावा, तिचा आस्वाद घेतलेल्यांनी केला आहे. ब्लॅक फ्राईड इंटेस्टाइन डिश आणि मिल्क फिश इंटेस्टाइन सूप, असं या पदार्थांचं नाव आहे. हे दोन्ही पदार्थ मिल्क फिश (Milk Fish) नावाच्या माशाच्या आतड्यांपासून बनवले जातात. ही डिश पाहिल्यावर असं वाटतं की त्यात किडे पडले आहेत. हे वाचा -  ऐकावं ते नवल! हिला चक्क भाज्यांची वाटते भीती; पाहताच दरदरून फुटतो घाम कारण… दक्षिण तैवानमध्ये मिल्क फिश माशांचं पालन मोठ्या प्रमाणावर केलं जातं. या डिशसाठी वापरण्यात येणारं मिल्क फिश माशाचं आतडं हे लवकर खराब होतं. अगदी फ्रिजमध्ये ठेवलं तरी ते लवकर सडतं. त्यामुळे हे मासे पकडल्यानंतर लगेचच त्याचं आतडं काढून हे पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे ज्या भागात या माशाचं पालन केलं जातं, त्या भागात या डिशेस सहज उपलब्ध होतात. (फोटो - Twitter/@iamhereTainan)

(फोटो - Twitter/@iamhereTainan)

मिल्क फिश संपूर्ण आतडं हे खाण्यायोग्य नसतं. त्यातील काही भागच खाण्यासाठी वापरला जातो उर्वरित भाग फेकून दिला जातो. या माशांची आतडी खाण्यायोग्य असावी, अन्नपदार्थ आतड्यातून बाहेर निघून जावेत यासाठी माशांना काही काळ उपाशी ठेवलं जातं. त्यानंतर मासे कापून त्यांच्या आतड्यांचा वापर खास डिशेस बनवण्यासाठी केला जातो. हे वाचा -  बिअरचा एक ग्लास देईल तुम्हाला मोठा त्रास, Beer पिण्यापूर्वी हे वाचाच या डिशेस दिसायला किळसवाण्या असल्या तरी हा पदार्थ आवडीने खाणारे खवय्ये देखील आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या