JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Breakup नंतर पुरुषांमध्ये वाढतो मानसिक आजाराचा धोका, संशोधनातून आलं निदर्शनास

Breakup नंतर पुरुषांमध्ये वाढतो मानसिक आजाराचा धोका, संशोधनातून आलं निदर्शनास

प्रेम भयानक रूप धारण करतं जेव्हा पार्टनरसोबतचं नातं बिघडतं किंवा ब्रेकअप (Breakup) होतं. ही ती परिस्थिती आहे जेव्हा आपलं नातं पहिल्यासारखं राहिलं नाही यावर विश्वास ठेवणं कठीण होतं आणि त्यातून आपल्याला बाहेर पडता येत नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी:  प्रेम (Love) एक खूप सुंदर भावना आहे. ज्याच्या आधारे अनेकजण आपलं आयुष्य सहज आणि आनंदात जगतात. प्रेमात एवढी ताकद आहे की, अशक्य गोष्टीही शक्य करण्याची हिंमत माणसात येते. पण हेच प्रेम भयानक रूप धारण करतं जेव्हा पार्टनरसोबतचं नातं बिघडतं किंवा ब्रेकअप (Breakup) होतं. ही ती परिस्थिती आहे जेव्हा आपलं नातं पहिल्यासारखं राहिलं नाही यावर विश्वास ठेवणं कठीण होतं आणि त्यातून आपल्याला बाहेर पडता येत नाही. हिंदुस्थान टाईम्सच्या बातमीनुसार एका अभ्यासात हे समोर आलं आहे की, ब्रेकअपनंतर पुरूषांमध्ये चिंता, डिप्रेशन आणि आत्महत्येचे विचार येतात. मानसिक आजारांचा धोका वाढतो. हा अभ्यास ‘सामाजिक विज्ञान आणि चिकित्सा- आरोग्य गुणवत्ता संशोधन’ मध्ये प्रकाशित झाला आहे. ज्यामध्ये ब्रेकअपनंतर पुरुषांच्या मानसिक स्थितीवर काय परिणाम होतो, याबाबत संशोधन करण्यात आलं. IND vs WI : कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर धवननं जोडले हात, Photo पाहून फॅन्स म्हणाले… संशोधनात हेही आढळलं कि, ज्या पुरूषांमध्ये बेक्रअपनंतर उदासीनता किंवा निराशा आली. ते राग, माफी, उदासीनता आणि लाज वाटण्यासारख्या भावनांचा सामना करण्यासाठी दारू आणि इतर अंमली पदार्थांचं सेवन करू लागले. कॅनडातील नर्सिंगचे यूबीसी प्रोफेसर आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. जॉन ओलिफ (Dr John Oliffe) म्हणाले, “ब्रेकअप (Breakup) झाल्यानंतर बहुतांश पुरुषांमध्ये मानसिक आजारांची लक्षणं दिसून आली. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर झाला. यूबीसीच्या मेन्स हेल्थ रिसर्च प्रोग्राम (UBC’s Men’s Health Research Program) मध्ये डॉ. ओलिफ आणि त्यांच्या टीमने ब्रेकअप झालेल्या 47 पुरुषांची मुलाखत घेतली. ज्यामध्ये समोर आलं की, ज्या पुरूषांना आपल्या नात्यांमध्ये संघर्ष करावा लागतो ते पुरूष समस्यांना कमी लेखतात, परिणामी नाती अजूनच ताणली जाऊन तुटतात. दुसरीकडे यातील सकारात्मक पैलूंवर जेव्हा संशोधन करण्यात आलं. तेव्हा कळलं कि, ब्रेकअपनंतर पुरुष आपली मानसिक स्थिती नीट ठेवण्यासाठी स्वतःला अनेक गोष्टींत गुंतवून घेतात. जसं व्यायाम, वाचन आणि स्वतःची काळजी घेणं यासारखे प्रयत्न यात सामील होते. रात्री EX-Boyfriend ला गेली भेटायला पार्कमध्ये, सकाळी आढळला अर्धनग्न मृतदेह त्यामुळे ब्रेकअपचा परिणाम हा महिलांवरच होतो असं नाही. पुरूषांनाही ब्रेकअपनंतर मानसिक आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वेळीच आपल्या नात्याला वेळ द्या आणि जपा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या