मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs WI: कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर धवननं जोडले हात, Photo पाहून फॅन्स म्हणाले...

IND vs WI: कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर धवननं जोडले हात, Photo पाहून फॅन्स म्हणाले...

वेस्ट इंडिज विरूद्धच्या वन-डे टीममधील (India vs West Indies) भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. शिखर धवननं (Shikhar Dhawan) कोरोना झाल्यानंतर पहिल्यांदाच त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने हात जोडले आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 4 फेब्रुवारी: वेस्ट इंडिज विरूद्धच्या वन-डे टीममधील (India vs West Indies) भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे ते वन-डे मालिकेतून जवळपास आऊट झाले आहेत.

शिखर धवन, अय्यर आणि गायकवाड यांना आता एक आठवडा आयसोलेशनमध्ये काढवा लागेल. त्यानंतर  2 आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर टीममध्ये पुन्हा दाखल होणार आहेत. धवननं कोरोना झाल्यानंतर पहिल्यांदाच त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने हात जोडले आहेत.

'तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. मी चांगला  असून तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे भारावलो आहे.' असं कॅप्शन धवननं या फोटोला दिले आहे. धवनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून फॅन्सनी त्याला लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

'चॅम्पियन लवकर बरा हो', तुला मैदानात मिस करेल अशी प्रतिक्रिया धवनची फॅन इशिका मलिकनं दिली आहे. तर सरवाना या युझरनं, 'शिखी लवकर बरा हो. वेस्ट इंडिज विरूद्धच्या मालिकेतील सुरूवातीच्या ओव्हर्स तुझ्याशिवाय पाहणे अवघड आहे.' अशी भावना व्यक्त केली आहे.

भारतीय टीममधील ओपनरना कोरोनाची लागण झाल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून मयांक अग्रवालचा (Mayank Agarwal) टीममध्ये समावेश करण्यात आलाय. पण त्याचा 3 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी रविवारी मॅचच्या दिवशीच संपणार आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून इशान किशनचा (Ishan Kishan) वन-डे टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. पहिल्या मॅचमध्ये इशान रोहितसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

पुजारा-रहाणेसाठी 'करो वा मरो'ची लढाई, करिअर वाचवण्यासाठी दिग्गजांनी कसली कंबर

इशाननं आजवर टीम इंडियाकडून 2 वन-डे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 30 च्या सरासरीनं 60 रन काढले आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. लिस्ट A क्रिकेटमध्ये त्याने 76 इनिंगमध्ये 37 च्या सरासरीनं 2609 रन काढले आहे. 4 शतक आणि 13 अर्धशतकाच्या मदतीने त्याने हे रन केले आहेत. त्याचा या प्रकारातील स्ट्राईक रेट 92 आहे.

First published:

Tags: Covid-19, Covid-19 positive, Cricket, India, Ishan kishan, Shikhar dhavan, Shreyas iyer, Sports, West indies