बीजिंग, 10 फेब्रुवारी : पंचपक्वान म्हटलं की ते खाण्यासाठी जितका उत्साह आपल्याला असतो तितका तो बनवण्यात क्वचितच असतो. म्हणजे काही लोक असे आहेत ज्यांना स्वतःच्या हाताने करून दुसऱ्यांना खायला द्यायला आवडतं. तर काही असे असतात ज्यांना खायला आवडतं पण तेच त्यांना बनवायला सांगितलं की तितकाच कंटाळा येतो. त्यातच खेळण्याबागडण्याचं वय असेल अशा लहान मुलांकडून तर साधी मॅगी बनवण्याचीही अपेक्षा नसते. पण याच वयाच्या मुलाने आपल्या कुकिंग स्किलने सर्वांनाच थक्क केलं आहे (Master chef). वय वर्षे 13… हे वय म्हणजे खाण्यापिण्याचं ना की स्वयंपाक बनवण्याचं (13 Year Old Chef). पण अशी काही लहान मुलं आहे जी या वयात स्वतः कुकिंग करतात, अशाच मुलांपैकी एक असलेला 13 वर्षांचा हुआंग युटेंग. जो चीनच्या जहेजिआंगमध्ये ( Zhejiang) राहतो. त्याने पंचपक्वान नव्हे तर इतके पदार्थ बनवले की फक्त आकडा वाचूनच तुम्हाला चक्कर येईल. तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याने चक्क 20 पदार्थ बनवले आहेत (13 Year old Child Cooks 20 Dishes). हे वाचा - फक्त लेकीच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून बाबाने आपल्या छातीवर… ओरिएंटल डेलीच्या रिपोर्टनुसार 13 वर्षांचा हुआंग युटेंगला शाळेच्या शिक्षकांनी प्रोजेक्ट दिला होता. ज्यामध्ये एखादा पदार्थ स्वतःच्या हाताने बनवून कुटुंबाला खायला घालायचा होता. पण हुआंगने हा प्रोजेक्ट इतका मनावर घेतला की त्याने एक नव्हे तर तब्बल 20 डिशेस बनल्या. त्याने बनवलेल्या पदार्थांनी डायनिंग टेबल भरून गेलं. त्याच्या आईने हा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. जो व्हायरल होतो आहे. फोटोत पाहू शकता डायनिंग टेबलवर 28 प्रकारच्या डिशेस आहेत. त्यापैकी 20 हुआंगने तर 8 त्याच्या आईने बनवल्या आहेत. माहितीनुसार हुआंगची आई एक रेस्टॉरंट चालवते. आईला कुकिंग करताना पाहूनच हुआंगलाही स्वंयपाकाची आवड निर्माण झाली. शाळेच्या सुट्टीत तो आईकडून त्याने पाककलेचे धडे घेतले. आता प्रोजेक्टच्या निमित्ताने त्याने आपल्यातील हे टॅलेंट दाखवून दिलं. हुआंग सांगतो त्याला कुकिंग खूप आवडतं. हे वाचा - वाढत्या वजनाचं टेन्शन सोडा; आता इंजेक्शनने कमी होणार लठ्ठपणा ही पोस्ट पाहिल्यानंतर काही नेटिझन्सनी या मुलांचं कौशल्य पाहून त्याचं कौतुक केलं आहे तर काहींनी त्याच्या आईवर इतक्या लहान मुलाला स्वयंपाक करायला लावल्याने टीका केली आहे. तरी आपल्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटतो, असं सडेतोड उत्तर हुआंगच्या आईने ट्रोलर्सला दिलं आहे.