आंबे खाऊनही वजन कमी करता येईल? जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत
मुंबई, 9 मे : सध्या आंब्यांचा सीजन सुरु असल्याने बाजारात वेगवेगळ्या प्रजातीचे आंबे विक्रीसाठी आले आहेत. आंबा हा चवीला चांगला असण्यासोबतच तो आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. अनेकदा लोक आंबा खाल्याने वजन वाढते असे म्हणतात पण हे पूर्ण सत्य नाही. जर आंब्याचे सेवन योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केले तर वजन वाढत नाही. आंब्यामध्ये सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. एक कप चिरलेल्या आंब्यामध्ये 99 कॅलरीज, 1.4 ग्रॅम प्रथिने, 25 ग्रॅम कार्ब, 22.5 ग्रॅम साखर, 2.6 ग्रॅम फायबर, 67% व्हिटॅमिन C, 18% फोलेट, 10% व्हिटॅमिन A आणि 10% व्हिटॅमिन E असते. याशिवाय यामध्ये कॅल्शियम, झिंक, लोह आणि मॅग्नेशियमचे देखील काही प्रमाणात असते. वजन कमी करण्यासाठी आंब्याचे सेवन कसे कराल : आंब्याचे सेवन प्रमाणात करा : आंब्यामध्ये मायक्रोन्युट्रिएंट्स आणि फायबर असतात, तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तरीही तुम्ही आंबे खाऊ शकता, परंतु आंबा मर्यादित प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करा. जास्त प्रमाणात आंब्याचे सेवन केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. Period Pain Relief : एक ग्लास पाणी आणि…; मासिक पाळीदरम्यान होणारी पोटदुखी काही मिनिटात होईल बंद! जेवणानंतर आंबा खाऊ नका : जेवल्यानंतर आंबा कधीही खाऊ नये. कारण यामुळे तुमच्या शरीरात जास्त कॅलरीज जाऊ शकतात. आंबा नेहमी दुपारी खायला हवा. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्नॅक म्हणूनही आंब्याचं सेवन करू शकता. स्नॅक्स म्हणून खा : जर तुम्ही एक वाटी आंबा स्नॅक्स टाईममध्ये खात असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आंब्यामध्ये आहारातील फायबर्स मुबलक प्रमाणात असतात. याशिवाय आंबा एनर्जी बूस्टर म्हणूनही काम करतो. प्री-वर्कआउट फूड म्हणून आंबा खाणे खूप फायदेशीर ठरते.
आंब्याचा ज्यूस बनवून पिणे टाळा : आंब्याचा ज्यूस किंवा मँगो शेक बनवण्याऐवजी आंबा कापून तसाच खा. ज्यूस किंवा शेक बनवल्याने आंब्यातील सर्व फायबर नष्ट होतात. परंतु वजन कमी करण्यासाठी आहारात आंब्याचा समावेश करण्यापूर्वी तुमच्या डायटिशनचा देखील सल्ला घ्या.