आलं : तज्ञांच्या म्हणण्यानुसार मासिक पाळी दरम्यान दररोज कोमट आल्याचे पाणी प्यायल्याने वेदना, सूज , क्रॅम्प्स येण्यापासून आराम मिळतो. आल्याचे पाणी मासिक पाळीच्या दिवसात प्रभावी ठरू शकते.
अननस : अननसमध्ये ब्रोमेलेन एंजाइम असते जे मासिक पाळीच्या दरम्यान ब्लोटिंग आणि ओटीपोटात क्रॅम्पच्या समस्यांशी लढा देऊन आराम करण्यास मदत करते.
लिंबू : मासिक पाळीच्या काळात अनेक वेळा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने महिलांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते. तेव्हा, लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड अन्नातील लोहाचे शोषण वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे या काळात लिंबाचे सेवन केल्याने चिडचिडेपणा आणि मूड स्विंग यांसारख्या समस्याही टाळता येतात.
कलिंगड : कलिंगडमध्ये लाइकोपीन नावाचे प्लांट कंपाउंड असते, जे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते. या काळात टरबूज खाल्ल्याने हाता-पायांची सूज कमी होते.
बीट : मासिक पाळीत रक्तस्त्राव झाल्यास स्त्रीच्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. त्यामुळे महिलांच्या शरीरात लोहाची कमतरता होते आणि शरीर सुस्त होऊ लागते. तेव्हा आहारात बीटचे सेवन केल्याने शरीरातील लोहाची कमतरता तर दूर होतेच पण शरीरातील ऊर्जा पातळी राखण्यासही मदत होते.