JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Smoking सोडण्याचा असाही फायदा! कंगाल तरुणाचं नशीब फळफळलं; आज आहे लखपती

Smoking सोडण्याचा असाही फायदा! कंगाल तरुणाचं नशीब फळफळलं; आज आहे लखपती

स्मोकिंग सोडण्याच्या एका निर्णयामुळे या तरुणाचं आयुष्यच बदलून गेलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 01 फेब्रुवारी : स्मोकिंग (Smoking) म्हणजे धूम्रपान हे आरोग्यासाठी हानिकारक आहे  (Smoking is Injurious to Health) हे आपल्याला माहिती आहे. सिगारेटच्या बॉक्सवरही तशी वॉर्निंग दिलेली असते. तरी लोक त्याला गांभीर्याने घेत नाही. जोपर्यंत त्याचा गंभीर दुष्परिणाम दिसत नाही तोपर्यंत सिगारेट फुंकणं काही सोडत नाही. काही लोक तर आजारी पडले तरी सिगारेट फुंकत राहतात. स्मोकिंग करणाऱ्या अशाच सर्वांसाठी ही महत्त्वाची बातमी. स्मोकिंग सोडणं तुमच्या आरोग्यासाठी तर फायद्याचं आहेच पण सोबतच त्याचा आणखी एक मोठा फायदा आहे. जो या व्यक्तीला झाला आहे. स्मोकिंग सोडताच एक व्यक्ती मालामाल झाली आहे. कंगाल झालेल्या या व्यक्तीने धूम्रपान न करण्याचा एक निर्णय घेतला आणि त्यानंतर त्याचं नशीबच फळफळलं. तो लखपती झाला आहे. फक्त 3 वर्षांतच तो तब्बल 17 लाख रुपयांचा मालक झाला आहे (Man stop smoking save 17 lakhs). सुरुवातीला लोक त्याला बेकार, व्यसनी म्हणून हिणवत होते पण त्याला आता सन्मानही दिला जातो आहे. वयाच्या तेराव्या वर्षापासून तो स्मोकिंग करू लागला. शाळेत असताना आपल्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसोबत तो राहू लागला आणि त्याला स्मोक करण्याची सवय लागली. हळूहळू स्मोकिंगसाठी त्याने शाळेतही जाणंही कमी केलं. यावरून पालकांसोबतही त्याचा वाद झाला आणि वयाच्या 16 व्या वर्षीच त्याने घर सोडलं. जवळपास 6 आठवडे तो लंडनच्या रस्त्यावर राहिला. हे वाचा -  ‘माझा श्वास गुदरमतोय’, ब्रेस्टला वैतागली महिला; लोकांसमोर मदतीसाठी पसरले हात त्यानंतर त्याला आपली चूक समजली. त्याने आपल्या वडिलांना फोन केला. त्यांनी त्याला ग्लासगोची तिकीट पाठवली. तिथं त्याला नोकरी मिळवून दिली. 2011 साली त्याचं ब्रेकअपही झालं तेव्हा तो दोन मुलांचा वडील बनला होता. पण त्यानंतर तो पुन्हा बेघर आणि एकटा झाला. आपल्या या सर्व समस्या सिगारेटमुळेच सुरू झाल्या हे त्याला कळून चुकलं. कमी वयातच शाळा, घर, कुटुंबापासून दूर राहावं लागल्याची जाणीव त्याला झाली. त्यानंतर 2018 साली त्याने स्मोकिंग बंद करण्याचा निर्णय घेतला. ऑफिस कर्मचाऱ्यांसोबत त्याने या चांगल्या गोष्टीला सुरुवात केली आणि हळूहळू त्याचं हे व्यसन पूर्णपणे सुटलं. आता त्याला दुसरं कुणी स्मोकिंग करत असेल तेसुद्धा आवडत नाही. हे वाचा -  पैसा खरंच आनंद देतो का? संशोधनातून समोर आलं सत्य 20 वर्षांनंतर त्याने सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या या एका निर्णयाने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. एकेकाळी कंगाल असलेला हा तरुण आज लखपती आहे. दर आठवड्याला तो सरासरी 110 पाऊंड म्हणजे जवळपास 11 हजारांची सिगारेट प्यायचा. स्मोकिंग सोडून त्याला आता 3 वर्षे झाली आहेत. त्याने 17,000 पाऊंड म्हणजे तब्बल 17 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे बचत केले. सोबतच आपल्या आरोग्यासोबत खेळणं सोडून आपला जीवही वाचवला. एकंदरच सिगारेटला बाय बाय करून त्याने आरोग्य आणि संपत्ती दोन्ही सुधारली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या