JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लाळ तयार न झाल्यामुळेच केवळ तोंड कोरडं पडत नाही, हे आजार असू शकतात कारण

लाळ तयार न झाल्यामुळेच केवळ तोंड कोरडं पडत नाही, हे आजार असू शकतात कारण

वयानुसार लाळेचे उत्पादन कमी होत असल्याने तोंड कोरडे पडते. कोरडे तोंड हे औषधे किंवा तोंडाने श्वास घेण्याचे दुष्परिणाम देखील असू शकतात. पुरेसे पाणी प्यायल्यानेही ही समस्या उद्भवू शकते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 एप्रिल : तोंड कोरडे पडणे ही वृद्धांमध्ये एक सामान्य समस्या आहे. वयानुसार लाळेचे उत्पादन कमी होत असल्याने तोंड कोरडे पडते. कोरडे तोंड हे औषधे किंवा तोंडाने श्वास घेण्याचे दुष्परिणाम देखील असू शकतात. पुरेसे पाणी प्यायल्यानेही ही समस्या उद्भवू शकते. मात्र काही आजारही याचे कारण असू शकतात. आज आम्ही तुम्हाला तोंड कोरडे होण्याची कारणं आणि ही समस्या टाळण्यासाठी काही टिप्स सांगणार आहेत. एबीपी माझा मध्ये दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा लाळ तयार करणाऱ्या लाळ ग्रंथी काम करणं थांबवतात, तेव्हा तोंड कोरडे पडण्याची समस्या उद्भवते. याला झेरोस्टोमिया म्हणतात. लाळ तयार करणे ही शरीराची एक आवश्यक प्रक्रिया आहे. लाळेचे काम म्हणजे दातांच्या जीवाणूंद्वारे तयार होणारे आम्ल काढून टाकणे. यामुळे दातांमध्ये जंत होत नाहीत. तसेच हे अन्न गिळण्यास मदत करते. मात्र तोंड कोरडे पडल्याने या सर्व कार्यांवर परिणाम होतो.

सामान्य दिसत असली तरी गंभीर असतात ही 5 लक्षणं, किडनी निकामी होण्याचे असतात संकेत

तोंड कोरडे पडण्याची कारणं कमी पाणी प्यायल्यामुळे तोंड कोरडे शकतो. त्याच बरोबर काही अ‍ॅलोपॅथी औषधांमुळे, कॅन्सरच्या केमोथेरपीमुळे, पोटाच्या समस्येमुळेदेखील ही समस्या उद्भवू शकते. तर काहीवेळा काही आजारही याला कारणीभूत ठरू शकते. तोंड कोरडे पडणे मधुमेह, संधिवात, उच्च रक्तदाब, अशक्तपणा, पार्किन्सन डिसीज या त्रासांचेही लक्षण असू शकते.

तोंड कोरडे पडू नये म्हणून अशी घ्या काळजी अशा फळे आणि भाज्या खा, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच पाण्यासोबत इतर द्रवपदार्थांचे सेवन करा. दही, ताक, फळांचा रस प्यायल्यास उत्तम. कॅफिनयुक्त पदार्थ चहा-कॉफी कमी प्रमाणात प्या, काहीही खाल्ल्यानंतर दात नीट स्वच्छ करा, जेवताना एक किंवा दोन घोट पाणी पिऊ शकता. त्याचबरोबर तंबाखू, दारू, धूम्रपान यांचे सेवन पूर्णपणे बंद करा.

हेल्दी वाटणारे 7 पदार्थ तुम्हाला आजारी करू शकतात! आजपासूनच टाळा, राहाल निरोगी

संबंधित बातम्या

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या