फोटो सौजन्य - युट्यूब व्हिडीओ स्क्रिनशॉट
मुंबई, 10 मे : आता उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे फ्रीजमधील थंडगार पाणी प्यावंसं वाटतंच. त्यामुळे फ्रीजमधील पाण्याची बाटली बाहेर काढण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्ती दिवसातून किती तरी वेळा फ्रीज उघडतो. वारंवार फ्रीज उघडल्याने फ्रीजच्या आतील तापमानावर फरक पडतो आणि फ्रीजला वीजही जास्त लागते, ज्यामुळे लाईट बिल जास्त येतं, असं म्हणतात. पण आता फ्रीजमुळे लाईट बिल वाढण्याचं टेन्शनच नाही. साधा एक पेपर तुमच्या विजेची बचत करते. फ्रिजमुळे अधिक येणारं लाईट बिल कमी होईल. फ्रिजमुळे येणारं लाइट बिल कमी करण्याचा सोपा फंडा काही गृहिणींनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. युट्यूब अकाऊंटवर याचे व्हिडीओ आहेत. ज्यात फ्रीजच्या दरवाजात फक्त एक साधा पेपर अडकवल्याने लाइट बिल कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे. आता एक पेपर लाइट बिलची बचत कसं काय करेल? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर मग व्हिडीओ पाहुयात. तुम्ही पाहिलं असेल अनेकदा फ्रीजचा दरवाजा उघडायला गेल्यावर तो पटकन उघडतो किंवा किंचितसा उघडा राहतो. दरवाजा नीट लागत नाही. ज्यामुळे त्यातील थंड हवा बाहेर पडते. अशा परिस्थितीत फ्रीजला गॅस बनवण्यातही जास्त वीज लागते, त्याच्या कम्प्रेसरवर परिणाम होतो. आता फ्रीजचा दरवाजा नीट न लागण्याचं कारण म्हणजे दरवाजावर असलेला रबर. तुम्ही नीट पाहाल तर नव्या फ्रीजमधील रबर थोडा फुगीर असतो. पण तो जुना झाला की हा रबर चिकटतो. त्याच्यात घाणही साचते. ज्यामुळे दरवाजा नीट लागत नाही. केळी, अंडी एकत्र मातीत गाडली अन् झाला चमत्कार; VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल आता तुम्हाला करायचं काय आहे, तर फ्रीजच्या दरवाजाच्या मधोमध एक कागद धरायचा आहे. तुम्ही साधा पेपर किंवा टिश्यू पेपरही वापरू शकता. पेपरचा थोडासा भाग फ्रीजबाहेर राहिल अशापद्धतीने दरवाजा बंद करा. यानंतर फ्रीजच्या दरवाजात अडकवलेला पेपर हलक्या हाताने खेचण्याचा प्रयत्न करा. जर तो पेपर सहज आणि पटकन निघाला तर फ्रीजच्या रबरमध्ये समस्या आहे हे समजून जा. आता ते तुम्हाला दुरूस्त करायचं आहे. यासाठी तुम्ही दोन पद्धती वापरू शकता. एका बारीक काठीत कापूस टाकून त्याने रबरमधील घाण स्वच्छ करून घ्या. रबरमध्ये घाण साचलेली असल्याने ते चिकटलेले असतात त्यात लवचिकपणा नसतो. म्हणूनच फ्रीजचा दरवाजा नीट लागत नाही. पुणेरी तडका युट्यूब चॅनेलवर हा उपाय देण्यात आला आहे.
दुसरं म्हणजे हेअर ड्रायर किंवा रबरला गरम हवा मिळेल असं काहीतरी घेऊन रबरला गरम हवा द्या. यामुळे रबर फुलतील ते नीट होतील. गरिमास यमी फूडवर हा उपाय सांगण्यात आला आहे.
दोन्ही किंवा दोन्हीपैकी एक प्रक्रिया करून पाहा आणि त्यानंतर पुन्हा दरवाजात पेपर अडकवून ते खेचून पाहा. जर पेपर बाहेर आला तर केलेला उपाय आणखी एकदा करा. कागद बाहेर आला नाही तर समजा तुमचा दरवाजा घट्ट लागला आहे. आता दरवाजा घट्ट असल्याने फ्रिजमधील थंड हवा बाहेर येणार नाही आणि फ्रीजला थंड राहण्यासाठी फार विजेची गरज पडणार नाही. साहजिकच यामुळे तुमचं लाइट बिलही कमी होईल. एक्सपायर औषध गोळ्या फेकू नका, चहामध्ये टाका; मोठ्या त्रासातून मिळेल सुटका न्यूज 18 लोकमत या उपायाची कमी देत नाही. पण तुम्ही एकदा करून पाहा आणि तो किती परिणामकारक आहे, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हेही वाचा - Karnataka Election Result 2023 Live Updates : कर्नाटक निवडणूक निकालाचे लेटेस्ट अपडेट वाचा एका क्लिकवर