मुंबई, 10 मे : सामान्यपणे औषधं , औषधांच्या गोळ्या एक्सपायर झाल्या की त्या आपण फेकून देतो. अशी औषधं खाल्ल्यास त्याच्या फायद्याऐवजी आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशी औषधं खाऊ नये, असा सल्ला दिला जातो. पण एक्सपायर औषधंही खूप कामाची आहेत. या औषधांच्या वापराने तुम्हाला मोठ्या त्रासातून सुटका मिळेल. आपली आजी, आई अशा कित्येक गृहिणी ज्यांच्याकडे घरातील काही ना काही जुगाड असतात. म्हणजे ज्या कामासाठी आपण कित्येक रुपये खर्च करतो अशी कामं या गृहिणी अगदी कमी खर्चात किंवा एकही पैसा खर्च न करतात. ज्या गोष्टी आपण फेकून देतो, त्यांचा त्या पुनर्वापर करतात. अशा कितीतरी उपयुक्त टीप्स आहेत, ज्याचे व्हिडीओ या गृहिणी सोशल मीडियावरही शेअर करतात. अशाच टिप्सपैकी एक या एक्सपायर औषधांच्या वापराबाबत. एक्सपायर औषधं फेकण्याऐवजी त्याचा तुम्ही कसा वापर करू शकता, याची माहिती एका गृहिणीने सोशल मीडियावर दिली आहे. औषध गोळ्यांची रिकामी पाकिटं खूप कामाची, पैशांचीही होईल बचत; त्यांचं काय करायचं पाहा VIDEO तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तुम्ही एक्सपायर औषधांचा चहा बनवू शकता आणि हा चहा खूप फायद्याचा आहे. आता हा चहा कसा बनवायचा आणि त्याचा फायदा काय ते पाहुयात. युट्यूब व्हिडीओवर दिलेल्या माहितीनुसार एका भांड्यात थोडंसं पाणी घेऊन हे भांड गॅसवर ठेवा. त्यात एक एक्सपायर टॅबलेट टाका आणि चहा पावडर टाका. गोळी पाण्यात विरघळेपर्यंत पाणी गरम करा. त्यानंतर ते दुसऱ्या भांड्यात गाळून घ्या. या पाण्यात कॉटन म्हणजे कापूस बुडवून घ्या. कापसाचा हा गोळा तुम्ही किचनवर किंवा अशा ठिकाणी ठेवा. जिथं मुंग्या, झुरळं फिरतात. कितीही साफसफाई केली, स्वच्छता ठेवली तरी मुंग्या, झुरळं होतातच. त्यांचा त्रास असतोच. मग या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी हा सोपा असा उपाय आहे. या व्हिडीओत सांगितल्यानुसार या उपायाने पाण्यातील चहा पावडरमधील कॅफिने आणि एक्स्पायर गोळ्या यामुळे मुंग्या, झुरळं मरतील, त्यांचा त्रास होणार नाही. केळी, अंडी एकत्र मातीत गाडली अन् झाला चमत्कार; VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल Avika Rawat foods युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
हा उपाय प्रभावी ठरेलच याची हमी न्यूज 18 लोकमत देत नाही. पण तुम्ही हा उपाय करून पाहा आणि तो किती परिणामकारक आहे, हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.