पाण्याचा वापर न करता धुवा भांडी, 3 सोप्या टिप्सने काही मिनिटातच भांडी होतील चकाचक
मुंबई, 2 जुलै : भांडी धुणे हे घरातील रोजच्या कामांपैकी एक आहे. घरातील अस्वच्छ भांडी धुण्यासाठी डिशवॉशिंग साबण आणि पाणी इत्यादींची आवश्यकता असते. परंतु बर्याच वेळा भांडी धुताना पाणी संपते तेव्हा अशा परिस्थितीत काय करायचं असा प्रश्न पडतो. परंतु 3 सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही पाण्याशिवाय देखील भांडी व्यवस्थित स्वच्छ करू शकता. व्हिनेगर वापरा - तुम्ही पाण्याशिवाय भांडी धुण्यासाठी व्हिनेगर वापरू शकता. सर्व प्रथम, टिश्यू पेपरने घाण भांडी स्वच्छ करा. नंतर त्यावर व्हिनेगर स्प्रे करा. आता भांडी 5-10 मिनिटे ठेवा आणि नंतर पुन्हा टिश्यू पेपरने भांड्याचा प्रत्येक भाग स्वच्छ करा. असे केल्याने तुमची भांडी तर स्वच्छ होतीलच पण त्यांचा वासही नाहीसा होईल. ही एक अतिशय सोपी पद्धत आहे, जी तुम्ही फॉलो करू शकता. Health Tips : वारंवार होते यूरिन इंफेक्शन? तर लाईफस्टाईलमध्ये करा हे महत्वपूर्ण बदल सोडा आणि लिंबूने स्वच्छ करा - भांडी स्वच्छ करण्यासाठी 1 ते 2 चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्यात लिंबू पिळा. जर जास्त भांडी असतील तर सोडा आणि लिंबू यांचे प्रमाण वाढवा. तुम्ही या दोन गोष्टी एकत्र करून मिश्रण बनवा आणि ते भांड्यांवर चांगले लावा आणि काही वेळ राहू द्या. त्यानंतर टिश्यू पेपरच्या मदतीने भांडी नीट पुसून घ्या. यामुळे भांडी खूप चमकदार होतील आणि त्याला लिंबाचा वास येऊ लागेल.
राख किंवा लाकडाचा भुसा वापरा - राख किंवा लाकडाचा भुसा पाण्याशिवाय भांडी साफ करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. तुम्ही घाणेरडी भांडी राख किंवा भुसा सह पूर्णपणे स्वच्छ करा, नंतर कापड किंवा टिश्यू पेपरने ती पूर्णपणे स्वच्छ करा. याने तुमची भांडी सहज स्वच्छ होतील.