जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Health Tips : वारंवार होते यूरिन इंफेक्शन? तर लाईफस्टाईलमध्ये करा हे महत्वपूर्ण बदल

Health Tips : वारंवार होते यूरिन इंफेक्शन? तर लाईफस्टाईलमध्ये करा हे महत्वपूर्ण बदल

वारंवार होते यूरिन इंफेक्शन? तर लाईफस्टाईलमध्ये करा हे महत्वपूर्ण बदल

वारंवार होते यूरिन इंफेक्शन? तर लाईफस्टाईलमध्ये करा हे महत्वपूर्ण बदल

यूरिन इंफेक्शन रोखण्यासाठी केवळ औषधांवर अवलंबून रहाणे चालणार नाही तर यासह तुम्हाला तुमच्या आहारात आणि जीवनशैलीमध्ये देखील अनेक बदल करणे गरजेचे आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

यूरिन इंफेक्शन हा स्त्रियांमध्ये होणारे सर्वात सामान्य बॅक्टेरियल इंफेक्शन आहे. एका अहवालानुसार 50 ते 60 टक्के महिलांना आयुष्यात एकदातरी यूरिन इंफेक्शनचा त्रास होतो. लघवीमध्ये जळजळ होणे, वारंवार लघवी होणे, खालच्या ओटीपोटात दुखणे आणि दुर्गंधीयुक्त लघवी ही या संसर्गाची सामान्य लक्षणे आहेत. यूरिन इंफेक्शन रोखण्यासाठी केवळ औषधांवर अवलंबून रहाणे चालणार नाही तर यासह तुम्हाला तुमच्या आहारात आणि जीवनशैलीमध्ये देखील अनेक बदल करणे गरजेचे आहेत. तेव्हा हा संसर्ग रोखण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावे हे जाणून घेऊयात. पाणी पिणे महत्वाचे : शरीरात पाणी कमी पडले तर अनेक समस्या निर्माण होतात त्यापैकीच एक म्हणजे यूरिन इंफेक्शन. तेव्हा दिवसभरात पुरेसे पाणी प्यायला  हवे. पाणी प्यायल्याने लघवी पातळ होण्यास मदत होते. पाणी लघवीद्वारे शरीरात अडकलेले टॉक्सिन्स आणि बॅक्टेरिया सहज काढून टाकते. त्यामुळे यूरिन इंफेक्शन झाल्यास डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. क्रॅनबेरी : क्रॅनबेरी हे लाल रंगाचे आंबट फळ असून हे खाल्ल्याने  यूरिन समस्येत आराम मिळतो. क्रॅनबेरीचा रस, क्रॅनबेरी सप्लिमेंट्स किंवा वाळलेल्या क्रॅनबेरी खाल्ल्याने मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी होतो. क्रॅनबेरीमध्ये प्रोअँथोसायनिडिन नावाचा घटक असतो जो कोणत्याही बॅक्टेरियाला युरिन ट्रॅकच्या स्तरावर चिकटून राहण्यापासून प्रतिबंधित करतो. यामुळे यूरिन इंफेक्शन पासून आराम मिळतो.

News18लोकमत
News18लोकमत

प्रोबायोटिक आवश्यक : आतडयांमधील बॅक्टेरिया देखील यूरिन इंफेक्शनचे कारण असू शकते. प्रोबायोटिक्स पाचन तंत्राचे आरोग्य राखण्यास मदत करतात. प्रोबायोटीक्समुळे इ कोलाई सारखे वाईट जीवाणू नष्ट होण्यास मदत होते आणि यूरिन इंफेक्शन टाळता येते. Health : डाएट करताना तुम्ही हे ड्रिंक तर पीत नाही ना? अन्यथा होऊ शकतो कँसर लघवी थांबवू नका : जर यूरिन इंफेक्शन पासून वाचायचं असेल तर जास्त वेळ लघवी थांबवून ठेऊ नका. लघवी होणार असे वाटत असल्यास ती थांबवून न ठेवता लगेचच बाथरूममध्ये जावे. लघवी थांबवल्यामुळे बॅक्टेरियाचे प्रमाण वाढते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात