JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Sex Education | लैंगिक संबंध सुधारण्यासाठी करा Kegel Exercises, महिला-पुरुष दोघांसाठी फायदेशीर

Sex Education | लैंगिक संबंध सुधारण्यासाठी करा Kegel Exercises, महिला-पुरुष दोघांसाठी फायदेशीर

केगल व्यायाम (Kegel Exercises) महिलांसाठी खूप फायदेशीर आहेत. याला पेल्विक फ्लोर एक्सरसाइज (Pelvic Floor Exercises) असेही म्हणतात. कोणत्याही वयोगटातील महिला हा व्यायाम करू शकतात. त्याच वेळी, पुरुष देखील हा व्यायाम करू शकतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 फेब्रुवारी : लैगिक संबंध ठेवताना अनेकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यातील काही कारणे सामान्य आहेत. तुम्ही महिला असा किंवा पुरुष तुमच्या सेक्स लाईफमध्ये आनंद वाढवायचा असेल तर केगल एक्सरसाइज (Kegel Exercises) नक्की करा. केगल व्यायामाला (Kegel Exercises) पेल्विक फ्लोर व्यायाम (Pelvic Floor Exercises) म्हणतात. पेल्विक फ्लोरमध्ये खालच्या भागाचे (मूत्राशय, गर्भाशय, योनी आणि गुदाशय) स्नायू येतात, जे मूत्राचा भाग नियंत्रित करतात. लैंगिक प्रतिसादातही ते महत्त्वाची भूमिका बजावतात. केगल व्यायाम महिलांसाठी खूप फायदेशीर आहेत. कोणत्याही वयोगटातील महिला हा व्यायाम करू शकतात. पुरुषांना हवे असल्यास ते देखील हा व्यायाम करू शकतात. पेल्विक फ्लोअर व्यायामाचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. केगल व्यायाम काय आहे? myUpchar नुसार, पेल्विक स्नायू हे नितंबांच्या मध्यभागी असलेले स्नायू आहेत, जे गर्भाशय, मूत्राशय तसेच लहान आतडे आणि गुदाशय नियंत्रित करतात. केगल व्यायाम केल्याने पेल्विक स्नायू मजबूत होतात, ज्यामुळे महिलांमध्ये लैंगिक विकारांसोबतच, मूत्र आणि गर्भाशयाच्या समस्या देखील बऱ्या होतात. हा व्यायाम करताना, पेल्विक फ्लोअरचे स्नायू काही काळ आकुंचन पावतात, नंतर काही काळ सैल होतात, जसे लघवी थांबवण्याचा प्रयत्न करताना केले जाते. हा व्यायाम देखील त्याच प्रकारे केला जातो. जाणून घ्या केगल व्यायाम कसा करावा. हा व्यायाम शांत ठिकाणी बसून किंवा झोपून केला जाऊ शकतो. केगल व्यायामासाठी, पेल्विक स्नायूंना काही काळ सैल सोडा आणि नंतर काही काळ संकुचित ठेवा. व्यायाम करताना कंबर, पोट आणि मांड्यांचे स्नायू सैल ठेवावेत याची विशेष काळजी घ्या. स्नायू संकुचित आणि सैल सोडण्यासाठी 5 सेकंद लागू शकतात. ही प्रक्रिया 10-20 वेळा करत रहा. हा व्यायाम दिवसातून 2-3 वेळा केला जाऊ शकतो. केगल व्यायाम विशेषतः महिलांसाठी फायदेशीर आहे myUpchar नुसार, अनेक स्त्रियांना खोकताना, शिंकताना किंवा जोरात हसताना लघवी होण्याची समस्या असते, जे पेल्विक स्नायू सैल झाल्यामुळे होते. केगल व्यायाम करून या प्रकारची समस्या दूर केली जाऊ शकते. केगल व्यायाम केल्याने सेक्स दरम्यान उत्साह वाढण्यास मदत होते. आजकाल सामान्य प्रसूती कमी होते, मुख्यतः कमी शारीरिक श्रमामुळे. कमी मेहनतीमुळे शरीर सैल होते, त्यामुळे स्नायूही सैल आणि कमकुवत होतात. याच कारणामुळे अनेक महिला नॉर्मल डिलिव्हरीसाठी तयार नसतात, पण नॉर्मल डिलिव्हरी ही मूल आणि आई दोघांच्याही आरोग्यासाठी चांगली असते. त्यामुळे महिलांनी नॉर्मल डिलिव्हरीसाठी किगल व्यायाम करत राहावे. याशिवाय केगल व्यायाम केल्याने महिलांना रजोनिवृत्तीच्या वेळी फारसा त्रास होत नाही. पुरुषांसाठी किगल व्यायामाचे फायदे हा व्यायाम पुरुषांसाठीही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. महिलांप्रमाणेच, हा व्यायाम पुरुषांमध्येही पेल्विक फ्लोर मजबूत करतो. त्यांच्या लिंगामध्ये रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे त्यांची लैंगिक उत्तेजना वाढते. या व्यायामामुळे पुरुषांमध्ये लैंगिक क्षमता वाढते, तसेच लघवी नियंत्रणाची समस्याही सुधारते. News18 वरील आरोग्यविषयक लेख myUpchar.com द्वारे लिहिलेले आहेत. myUpchar हे आरोग्य बातम्यांचे देशातील पहिले आणि प्रमुख माध्यम आहे. myUpchar मध्ये डॉक्टरांसह संशोधक आणि पत्रकार तुमच्यासाठी आरोग्याशी संबंधित सर्व माहिती घेऊन येत असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या