भाडेकरू घर सोडेना, घरमालकाची कटकट, चेक झालाय बाऊन्स, बँक बुडाली?
मुंबई, 15 ऑक्टोबर : शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, असं आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं. त्याला अनेक कारणं आहेत. कायद्याची माहिती नसणे, कोर्टकचेऱ्या करण्यात येणारा खर्च आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्याय मिळण्यासाठी लागणारा मोठा कालावधी. पण, हे मत प्रत्येकवेळी बरोबरच असेल असं नाही. कारण, अनेक गोष्टी तुम्ही कोर्टाची पायरी न चढताच मिळवू शकतात. फक्त त्यासाठी तुम्हाला कायद्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. योग्य माहिती असल्यास तुम्ही अगदी रुपयाही खर्च न करता कोर्टातून न्याय मिळवू शकता. आणि हिच माहिती देण्यासाठी आम्ही #
कायद्याचंबोला
हे सदर घेऊन आलो आहोत. कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज
#कायद्याचंबोला
. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर
Rahul.Punde@nw18.com
या मेलवर आम्हाला सांगा.
भाडेकरार पूर्ण वर्षाऐवजी फक्त 11 महिन्यांचाच का? कारण आणि कायदेशीर परिणाम आपले वाचक रोहीत यांनी ई-मेलच्या माध्यमातून एक प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या वडिलोपार्जित गाळ्यामध्ये एक दुकानदार 20 वर्षांपासून राहत आहे. आधी दहा वर्षांचा करार होता. नंतर करार न करताच ते राहत आहे. ते नियमितपणे भाडेही देतायेत. मात्र, आता गाळा सोडायला तयार नाहीत. अशी परिस्थिती कदाचित तुमच्यावरही येऊ शकते. या संदर्भात कायदा काय सांगतो? सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. आता मीच मालक म्हणून भाडेकरू घरच सोडेना; घरमालकाने काय करावं? अनेकदा घरमालकाला भीती असते की जर एखादा भाडेकरू त्याच्या घरात जास्त काळ राहिला तर तो कायमचा ताबा घेऊ शकतो. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. भाडेकरू म्हणून घरमालकाची कटकट सहन करू नका; तुम्हालाही आहेत हे अधिकार तुम्ही जर भाड्याच्या घरात राहात असाल तर तुम्हाला काही कायदे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. बँक बुडाली तर ठेवीदारांच्या पैशाचं काय होतं? कशी मिळवायची रक्कम परत? गेल्या काही दिवसात आरबीआयने दोन बँकांचे परवाने रद्द केले आहेत. अशा परिस्थितीत बँक बुडाली किंवा लायसन्स रद्द झालं तर ठेवीदारांच्या पैशाचं काय होतं? हे माहीत असणे आवश्यक आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. चेक बाऊन्स झाल्यास पहिलं काम काय कराल? मिळेल अवघ्या 1 महिन्याची मुदत चेक बाऊन्स झाल्यावर सिबील स्कोअर प्रभावित होतो, ज्यामुळे तुम्हाला कर्ज घेणे कठीण होऊ शकते. कलम 417 आणि 420 अंतर्गत आरोपीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले जाऊ शकते. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. कायदेविषयक महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी यावर क्लिक करा. (कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) (लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)