मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

#कायद्याचंबोला : भाडेकरू म्हणून घरमालकाची कटकट सहन करू नका; तुम्हालाही आहेत हे अधिकार

#कायद्याचंबोला : भाडेकरू म्हणून घरमालकाची कटकट सहन करू नका; तुम्हालाही आहेत हे अधिकार

तुम्ही जर भाड्याच्या घरात राहात असाल तर तुम्हाला काही कायदे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहेत.

तुम्ही जर भाड्याच्या घरात राहात असाल तर तुम्हाला काही कायदे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहेत.

तुम्ही जर भाड्याच्या घरात राहात असाल तर तुम्हाला काही कायदे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

निलेश आणि प्राजक्ता गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात होते. दोघेही आयटी कंपनीत असल्याने एकदम मस्त चाललं होतं. दरम्यान, प्राजक्ताची कंपनी नवीमुंबईत शिफ्ट झाल्याने त्यांनी घर बदलायचं ठरलं. आधीचा मालक, घराचं लोकेशन एकदम परफेक्ट होतं. खरंतर त्यांना जीवावर आलं होतं. पण, सोबत राहायचं म्हटल्यावर एव्हढं करणं भाग होतं. दोघांनी नो ब्रोकर अ‍ॅपच्या माध्यमातून एक घरं शोधलं. प्रत्यक्ष जाऊन पाहिलं, मालकाला त्यांच्याबद्दल सगळी माहिती दिली. ठरल्याप्रमाणे राहायला गेले. दरम्यान, माहेरी गेलेली घरमालकाची बायको दोन दिवसांनी परतली. निलेश-प्राजक्ता अविवाहित असूनही सोबत राहत असल्याचं तिला समजलं. दुसऱ्याच दिवशी तिनं घर खाली करण्यास सांगितलं. अशी परिस्थिती कोणावरही येऊ शकते. त्यामुळे भाडेकरुंना त्यांचे अधिकार माहीत असणे आवश्यक आहे.

Kaydyach bola Legal

कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.


भाडेकरुच्या पाहुण्यांना रोखणे कायद्याने गुन्हा

आयपीसी कलम 339 (चुकीचा प्रतिबंध): कोणत्याही व्यक्तीला परवानगी असलेल्या ठिकाणी जाण्यापासून रोखणे कायद्यानुसार गुन्हा आहे. जेव्हा भाडेकरू आणि घरमालक यांच्यात भाडे करार होतो, तेव्हा ठराविक कालावधीसाठी घराच्या काही भागावर भाडेकरूचा हक्क असेल असे ठरवले जाते. अशा परिस्थितीत भाडेकरूच्या पाहुण्यांना घरात नाकारणे गुन्हा ठरतो. घरमालकाने असे केल्यास भाडेकरू त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकतात.

भाडेकरुन कोंडणे

आयपीसीचे कलम 340 (चुकीच्या पद्धतीने बंदिस्त करणे): कोणालाही बंदिवान करणे हा गुन्हा आहे. जर घरमालकाने घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावले आणि भाडेकरूला त्याची दुसरी चावी दिली नाही, त्याच्या खोलीला बाहेरून कुलूप लावले किंवा ठराविक वेळेनंतर घराबाहेर पडण्यास मनाई केली, तर त्या घरमालकाला एक महिना ते एक वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

भाडेकरूच्या घरात परवानगीशिवाय कॅमेरा बसवणे

IPC कलम 354-सी : भाडेकरूच्या घराजवळ, विशेषत: महिला भाडेकरूच्या घरात किंवा तिच्या परवानगीशिवाय घरात कॅमेरा बसवणे, जेणेकरून तिच्या गोपनीयतेचे उल्लंघन होईल, हा फौजदारी गुन्हा आहे. यात तीन ते सात वर्षे शिक्षा होऊ शकते. शिक्षा आणि आर्थिक शिक्षेचीही तरतूद आहे.

पाळीव प्राणी ठेवण्यासपासून रोखणे

प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंध कायदा: या कायद्यांतर्गत अपार्टमेंट असोसिएशन आणि रेसिडेंट वेल्फेअर सोसायटीसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पाळीव प्राण्यांवर कोणतेही निर्बंध लादले जाऊ शकत नाहीत. कारण असे केल्यास घटनेच्या कलम 51 नुसार (जी) (मूलभूत कर्तव्ये) चे उल्लंघन केले जाईल. त्यामुळे भाडेकरूला पाळीव प्राणी ठेवण्यापासून रोखता येत नाही.

वाचा - प्रेम असो की लिव्ह-इन रिलेशनशिप; अनमॅरिड कपल्सना हे नियम माहितीच हवे, अन्यथा..

वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार

भारतीय राज्यघटनेचे कलम 21 (जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार) : भारतीय संविधान कायद्यासमोर समानता आणि सर्व नागरिकांना कायद्याचे समान संरक्षण प्रदान करते. कलम 21 हे स्पष्ट करते की कोणत्याही व्यक्तीला त्याचे जीवन आणि स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. त्यामुळे, भाडेकरूची अनुपस्थिती किंवा त्याच्या परवानगीशिवाय घरात प्रवेश करणे हे पर्सनल लिबर्टीचे उल्लंघन आहे. एवढेच नाही तर भाडे कराराचा कालावधी पूर्ण न झाल्यास घरमालक भाडेकरूला नोटीस दिल्याशिवाय घराबाहेर पडण्यास सांगू शकत नाही. असे करणे केवळ भाडे कराराचे उल्लंघन करणार नाही तर तो मानसिक छळही मानला जाईल.

दोन महिन्यांच्या भाड्यापेक्षा जास्त अनामत रक्कम घेऊ शकत नाही

नवीन कायद्यानुसार, भाडेकरूंना सिक्युरिटी डिपॉझिट रक्कम दोन महिन्यांच्या भाड्यापेक्षा जास्त असू शकत नाही. घरमालक भाडेकरूला भाडे वाढवण्यासाठी किमान तीन महिने अगोदर नोटीस देईल. जर दोन्ही पक्ष परस्पर संबंधांच्या आधारावर सहमत नसतील तर भाडे वाढू शकत नाही. याशिवाय घराची पाहणी करण्यासाठी येण्यापूर्वी घरमालकाला 24 तासांची नोटीस द्यावी लागेल. भाड्याच्या तिप्पट सिक्युरिटी डिपॉझिट घेणे बेकायदेशीर ठरेल जोपर्यंत करार केला जात नाही. भाडेकरूने घर सोडल्यानंतर एक महिन्याच्या आत घरमालकाला डिपॉझिट परत करावे लागेल. वाद झाल्यास घरमालक भाडेकरूच्या वीज, पाणी या सुविधा तोडू शकणार नाहीत.

नूतनीकरणानंतर भाडे वाढवणे

इमारतीच्या देखभालीसाठी भाडेकरू आणि घरमालक दोघेही जबाबदार असतील, असे कायदा सांगतो. जर घरमालकाने काही सुधारणा केल्या तर त्याला नूतनीकरणाचे काम संपल्यानंतर एक महिन्यानंतर भाडे वाढवण्याची परवानगी दिली जाईल. मात्र, त्यासाठी भाडेकरूचा सल्लाही घेतला जाणार आहे. भाडे कराराच्या अंमलबजावणीनंतर, घर खराब झाल्यास आणि घरमालक तिचे नूतनीकरण करण्याच्या स्थितीत नसल्यास, भाडेकरू भाडे कमी करण्यास सांगू शकतात.(कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)

First published:

Tags: Law, Legal