JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Ghee Adulteration: खरेदी करताना फसू नका, शुद्ध तुपामध्ये अशी केली जाते भेसळ; बघताच क्षणी ओळखा

Ghee Adulteration: खरेदी करताना फसू नका, शुद्ध तुपामध्ये अशी केली जाते भेसळ; बघताच क्षणी ओळखा

कोणत्या चांगल्या गोष्टींची मागणी वाढल्यानं त्या वस्तूंचा दर्जा खराब होण्याची शक्यता वाढते. आजकाल प्रत्येक गोष्टीत भेसळ होत असल्यानं बाजारात शुद्ध तूप मिळणं कठीण झालं आहे. यासाठी आपल्याला भेसळ ओळखता येणं गरजेचं आहे.

जाहिरात

तुपाचे फायदेही जाणून घ्या - तुपातील व्हिटॅमिन ई शरीरात अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. कर्करोग, संधिवात आणि मोतीबिंदू यांसारख्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत करते. तुपामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. तुपात वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात आणि ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. तूप खाल्ल्याने मन तीक्ष्ण होते आणि स्मरणशक्ती सुधारते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 02 मार्च : तूप (Ghee) हा भारतीय स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग आहे. तुपाचे आरोग्यदायी फायदे पाहता आता परदेशातही तूप खाण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे जेवणाला छान चव येते. तसंच, तुपात चांगलं कोलेस्ट्रॉल (Cholesterol) असल्याचंही अनेक संशोधनांनी सांगितलं आहे. यामुळे हृदयाला इजा होत नाही आणि वजनही वाढत नाही. कोणत्या चांगल्या गोष्टींची मागणी वाढल्यानं वस्तूंचा दर्जा खराब होण्याची शक्यता वाढते. आजकाल प्रत्येक गोष्टीत भेसळ होत असल्यानं बाजारात शुद्ध तूप मिळणं कठीण झालं आहे. तसे तुम्ही शुद्ध तूप घरी बनवून खाऊ शकता. मात्र, जर तुम्ही ते बाजारातून खरेदी करत असाल तर काही उपाय आहेत ज्याद्वारे तुम्ही तुपाची शुद्धता तपासू (Identify ghee adulteration) शकता. बघुनच ओळखा तुम्ही शुद्ध देशी तूप फक्त रंग आणि सुगंधावरून ओळखू शकता. मात्र, आजकाल भेसळ करणारे एक पाऊल पुढे आहेत. शुद्ध तुपाचा रंग पिवळसर असतो. पांढरा दाणेदार भाग तळाशी राहतो आणि वर पिवळसर द्रव दिसतो. तूप महाग असेल तर अनेक ब्रँड्स त्यात स्वस्त तेल मिसळतात. उदा. खोबरेल तेल किंवा डालडा. गरम पॅनमध्ये ठेवा जर तुम्ही बाजारचे तूप खात असाल तर तुम्ही त्याची शुद्धता अशा प्रकारे तपासू शकता. पॅन गरम करा. त्यात 1 चमचा तूप घाला. जर तूप लगेच वितळले आणि तपकिरी रंगाचे झाले तर ते शुद्ध आहे. जर ते वितळण्यास वेळ लागला आणि पिवळसर झाले तर याचा अर्थ त्यात भेसळ आहे. हे वाचा -  रात्र-रात्रभर झोप येत नाही? ही ट्रिक वापरून 60 सेंकदात व्हाल गुडूप,एकदा करून बघा तळहातावर घेऊन टेस्ट दुसरा मार्ग म्हणजे तळहातावर तूप घेणं. तळहातावर तूप घेतलं की, काही वेळानं ते वितळायला लागतं. ते वितळत असेल तर शुद्ध तूप आहे, असे समजा. ते तसेच राहिले तर भेसळ झाली आहे. हे वाचा -  jaggery and gram benefits: मूठभर चणे आणि गूळ नियमित खा; आजारी पडणं विसरून जाल साखर घालून टेस्ट एक चमचा तूप वितळवून एका पारदर्शक बाटलीत घ्या. त्यात थोडी साखर घाला आणि बाटलीचे झाकण बंद करून हलवा. आता थोडा वेळ ठेवा. भांड्याच्या तळाला लाल रंग दिसला तर तुपात भेसळ आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या