Home /News /lifestyle /

रात्र-रात्रभर झोप लागत नाही? ही ट्रिक वापरून 60 सेंकदात व्हाल गुडूप, एकदा करून पाहा

रात्र-रात्रभर झोप लागत नाही? ही ट्रिक वापरून 60 सेंकदात व्हाल गुडूप, एकदा करून पाहा

धावपळीच्या जीवनशैलीत अनेक लोकांना झोप न लागण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. बऱ्याच लोकांना रात्री तासनतास झोप येत नाही (Insomnia) किंवा संपूर्ण रात्र फक्त कूस बदलण्यात घालवावी लागते.

    मुंबई, 25 फेब्रुवारी : चांगल्या आरोग्यासाठी आपल्या सर्वांना झोप खूप महत्त्वाची आहे. आपल्या आरोग्यासाठी जसं अन्न आवश्यक आहे, तसंच झोपही आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेची (Sleep for health) आहे. झोपेच्या कमतरतेमुळे त्याचा वाईट परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर दिसून येतो. धावपळीच्या जीवनशैलीत अनेक लोकांना झोप न लागण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. बऱ्याच लोकांना रात्री तासनतास झोप येत नाही (Insomnia) किंवा संपूर्ण रात्र फक्त कूस बदलण्यात घालवावी लागते. तुम्हालाही झोपताना या अडचणींचा सामना करावा लागत असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला एक असं तंत्र सांगणार आहोत, ज्यामुळे अंथरुणावर गेल्यानंतर लगेच झोप येईल. जाणून घेऊया (Good Sleep tips) या तंत्राबद्दल- सर्वप्रथम, हे जाणून घेणे खूप महत्वाचं आहे की, झोप न येण्यामागे लोकांच्या काही वाईट सवयी कारणीभूत आहेत. अनेक वेळा लोक झोपण्यासाठी अंथरूणावर जातात, पण झोपण्याऐवजी तासनतास फोन वापरतात. झोपताना इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायस वापरणं हे निद्रानाशाचे मुख्य कारण ठरू शकतं. झोप न येण्याच्या समस्येमुळे अनेकजण औषधांचाही आधार घेतात. पण आज आम्ही तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्हाला कोणत्याही औषधाशिवाय सहज झोप येईल. आपण 'ब्रीदिंग टेक्निक' बद्दल बोलत आहोत. हे वाचा - शनिदेवासोबत मकर राशीत मंगळही करणार एन्ट्री; या 4 राशीच्या लोकांनी काळजी घ्या आज तकने दिलेल्या बातमीनुसार, 4-7-8 हे तंत्र निद्रानाशाचा त्रास असलेल्या लोकांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतं. हे तंत्र तुमचे मन मोकळं करण्यास मदत करतं जेणेकरून तुम्ही सहज झोपू शकता. तसेच, जर तुमची झोप मध्यरात्री तुटत असेल आणि तुम्हाला पुन्हा झोप लागण्यास खूप त्रास होत असेल तर श्वास घेण्याचे तंत्र तुम्हाला यासाठी खूप मदत करू शकते. श्वासाचे तंत्र काय? 4-7-8 श्वास घेण्याचे तंत्र म्हणजे तुम्ही 4 सेकंदांसाठी श्वास घ्या आणि 7 सेकंदांसाठी श्वास रोखून ठेवा आणि 8 सेकंदांनी श्वास सोडा. या तंत्राने तुमचे मन शांत राहते, तणाव कमी होतो. स्नायूंच्या वेदना कमी करण्यासोबतच हे तंत्र तुम्हाला झोपायलाही मदत करते. या तंत्राने तुम्ही फक्त 60 सेकंदात झोपू शकता. या 4-7-8 श्वासोच्छवासाच्या तंत्राने निद्रानाशाची समस्या दूर होऊ शकते तसेच तृष्णा, राग आणि मायग्रेनची समस्या देखील नियंत्रित केली जाऊ शकते. हे वाचा - संपूर्ण फायदे मिळवण्यासाठी डाळी बनवताना करा या 3 गोष्टी; कुटुंब राहील निरोगी असे मानले जाते की हे तंत्र किमान 6 आठवडे केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. श्वासोच्छवासाचे हे तंत्र हृदयाच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे तणाव आणि चिंताग्रस्त समस्या दूर होऊ शकतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Sleep benefits

    पुढील बातम्या