पुणे, 28 जुलै : प्रत्येकाला सौंदर्य उत्पादने वापरण्याची भारी हौस असते. अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे स्किनकेयर वापरत असतात परंतु हे स्किनकेयर नेमके कुठं ठेवावीत हे अनेकांना माहिती नसतं . बहुतांश जण हे स्किनकेयर प्रॉडक्टस बाथरूममध्ये ठेवतात. तुम्हाला देखील ही सवय असेल तर ती लगेच बदला. पुण्यातल्या ब्युटीशियन प्रेरणा देशमुख यांनी या विषयाबद्दलचा धोका सांगितला आहे. काय होतो परिणाम? ‘मेकअप प्रॉडक्ट्स कधीही बाथरुममध्ये ठेवू नयेत . तेथील गरम आणि दमट वातावरणात ते खराब होऊ शकतात. सौंदर्यप्रसाधनांमध्ये वाढू शकणारे बॅक्टेरिया मोल्ड आणि बुरशी ओलसर वातावरणात वाढतात. त्याचा त्वचेवर चुकीचा परिणाम होऊ शकतो,’ असा सल्ला देशमुख यांनी दिला.
स्कीन प्रॉडक्ट बाथरुममध्ये ठेवले तर उष्णता आणि आर्द्रतेच्या सतत संपर्कामुळे त्यांचे अर्धे शेल्फ लाईफ कमी होऊ शकते. बाथरूममध्ये नेहमी ओलावा असतो. म्हणूनच त्वचेवर लावण्यात येणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये जिवाणू वाढू शकतात. गरम शॉवर घेतल्यानंतर तुमच्या त्वचेची काळजी घेणारी उत्पादने ऑक्सिडाइझ होऊ शकतात आणि उष्णतेमुळे ते खराब होऊ शकतात. म्हणूनच तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेणारी सीरम, नाईट क्रीम, फेस मास्क आणि डोळ्याच्या क्रीम नेहमी फ्रिजमध्ये ठेवावेत या व्यतिरिक्त, मॉइस्चरायझर्स, लोशन आणि ओठ बाम बंद हे प्रॉडक्टस केबिनमध्ये ओलावा आणि सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं. तुमच्या मुलाचं अभ्यासात नाही लागत लक्ष? ‘हे’ रत्न घातले तर होईल फायदा ‘हे’ प्रॉडक्ट फ्रिजमध्ये ठेवू नका सर्व ब्युटी प्रॉडक्ट फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही. विशेषत: काही प्रॉडक्ट फ्रिजमध्ये अजिबात ठेवू नयेत, असे देशमुख यांनी सांगितलं. लाइनर- लाइनर कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. कारण ते पटकन कोरडे होईल. लाइनर आणि मस्करा हे प्रोडक्ट्स खोलीच्या तपमानावर ठेवावेत. नेलपेंट- फ्रिजमध्ये नेल पॉलिश ठेवल्यामुळे ती सुकते आणि पटकन खराब होते. नेल पॉलिश जास्त काळ टिकवण्यासाठी ते फ्रिजमध्ये ठेवू नये.