मुंबई, 26 फेब्रुवारी : आपल्या घरात डाळ, तांदूळ, मसाले इत्यादी धान्य साठवण्याची (grains Store) परंपरा फार जुनी आहे. परंतु, साठविलेल्या धान्यांना पावसानंतर किंवा वातावरणातील बदलांमुळं अनेकदा ओलावा येतो. ओलसरपणामुळं चवितही फरक पडतो तसेच त्यामध्ये किडे (Insects) होऊ लागतात. आपल्या घरातील धान्याच्या पेट्यांवर किडे फिरताना तुम्ही पाहिले असतील. असं झाल्यास बरेच लोक हे धान्य खराब झालं म्हणून फेकून देतात, तर बरेच लोक ते स्वच्छ करून वाळवून पुन्हा वापरतात. परंतु, घरात वापरली जाणारी काही धान्य अशी असतात म्हणजे उदा. पीठ, जे स्वच्छ करून (How to protect grains from insects) वापरणं शक्य नसतं. घरातील पिठात किडे पडले तर ते स्वच्छ करता येत नाहीत. त्यामुळे फेकूण देणे हाच एकमेव मार्ग उरतो. आज आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरात ठेवलेल्या धान्यात किडे येणार नाहीत, चला जाणून घेऊया काही टिप्स. कडुलिंबाच्या झाडाची पाने तुमच्या घरातही खराब न होता धान्य साठवयाचे असेल तर धान्य ठेवण्यापूर्वी पेटी नीट धुवा आणि उन्हात चांगली वाळवा. ती चांगली सुकल्यावर त्यात कडुलिंबाची पाने टाका. साठवणुकीच्या धान्यामध्ये कडुलिंबाची पाने ठेवल्याने किडे वाढत नाहीत आणि धान्यात किडे असतील तर ते मरतात. हे वाचा - किडनी खराब होऊ लागल्याची अशी असतात 4 लक्षणं; त्वचेवरील या बदलांकडे दुर्लक्ष नको लाल मिरचीचा वापर साठवलेल्या पिठात किडींचा प्रादुर्भाव होण्याची समस्या अनेकदा दिसून येते. पिठात किडे येऊ नयेत म्हणून संपूर्ण लाल मिरचीचा वापर केला जाऊ शकतो. पिठात अख्खी लाल तिखट ठेवल्याने किडे पडत नाहीत आणि पीठ खराबही होत नाही. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास पिठात मीठ टाकूनही ठेवू शकता. हे वाचा - तुमच्याही बॉडीवर येताहेत का स्ट्रेच मार्क्स; हे घरगुती उपाय आहेत त्यावर फायदेशीर माचिसचा वापर घरात साठवलेल्या डाळींचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही डाळी आणि धान्य यांच्यामध्ये माचीच्या काड्या ठेवू शकता. माचीसच्या काड्यांमध्ये सल्फर आढळते. त्यामुळे डाळी आणि धान्यामध्ये आढळणारे कीटक मरतात आणि तुमचे धान्य सुरक्षित राहते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)