मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Stretch Marks Removal Tips: तुमच्याही बॉडीवर येताहेत का स्ट्रेच मार्क्स; हे घरगुती उपाय आहेत त्यावर फायदेशीर

Stretch Marks Removal Tips: तुमच्याही बॉडीवर येताहेत का स्ट्रेच मार्क्स; हे घरगुती उपाय आहेत त्यावर फायदेशीर

Stretch Marks Removal Tips: अनेक लोकांच्या शरीरावर वजन वाढल्यानंतर, कमी केल्यानंतर पोट, हात आणि मांड्या यांसारख्या ठिकाणी रेषा पडलेल्या दिसू लागतात. बहुतेक वेळा कोणत्याही वयोगटातील लोकांमध्ये असं होऊ शकतं.

Stretch Marks Removal Tips: अनेक लोकांच्या शरीरावर वजन वाढल्यानंतर, कमी केल्यानंतर पोट, हात आणि मांड्या यांसारख्या ठिकाणी रेषा पडलेल्या दिसू लागतात. बहुतेक वेळा कोणत्याही वयोगटातील लोकांमध्ये असं होऊ शकतं.

Stretch Marks Removal Tips: अनेक लोकांच्या शरीरावर वजन वाढल्यानंतर, कमी केल्यानंतर पोट, हात आणि मांड्या यांसारख्या ठिकाणी रेषा पडलेल्या दिसू लागतात. बहुतेक वेळा कोणत्याही वयोगटातील लोकांमध्ये असं होऊ शकतं.

मुंबई, 21 फेब्रुवारी : शरीरावरच्या काही खुणा दिसायला खूप विचित्र आणि खराब दिसतात आणि त्या काढणंही खूप कठीण असतं. असाच प्रकार स्ट्रेच मार्क्सच्या बाबतीतही आहे. अनेक लोकांच्या शरीरावर वजन वाढल्यानंतर, कमी केल्यानंतर पोट, हात आणि मांड्या यांसारख्या ठिकाणी रेषा पडलेल्या दिसू लागतात. बहुतेक वेळा कोणत्याही वयोगटातील लोकांमध्ये असं होऊ शकतं. तसंच, गरोदरपणात, बाळंतपणानंतर काही महिलांच्या पोटावर, स्तनांवर हे स्ट्रेच मार्क्स (Stretch Marks) दिसतात. ते लपवण्यासाठी किंवा घालवण्यासाठी खूप काही केलं जातं. काही घरगुती उपायांचा अवलंब करून आपण असे स्ट्रेच मार्क्स (Stretch Marks Removal Tips) घालवू शकतो.

स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी बाजारात अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत. पण अनेकदा स्ट्रेच मार्क्सवर ती कुचकामी ठरतात. तर, काही त्वचेसाठी योग्य ठरत नाहीत. इतकंच नाही तर, अनेक वेळा त्यांचे दुष्परिणामही दिसून येतात. हे स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी तुमच्या घरात असलेल्या काही नैसर्गिक वस्तू वापरता येतील. चला, जाणून घेऊ, स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय.

घरी तयार करा नैसर्गिक स्क्रब

त्वचेचे स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी तुम्ही घरीच नैसर्गिक स्क्रब बनवू शकता. यासाठी एका भांड्यात अर्धा चमचा बदाम पावडर घ्या. त्यात 1 चमचा कॉफी, 1 चमचा साखर आणि खोबरेल तेलाचे काही थेंब घाला. नीट फेटून त्याची पेस्ट बनवा आणि स्ट्रेच मार्क्सवर हा स्क्रब रोज वापरा. तुमचे स्ट्रेच मार्क्स काही दिवसात कमी होऊ लागतील.

लिंबाच्या सालीची पावडर ठरेल प्रभावी

त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी लिंबाच्या सालीची पूड अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरली जाते. ही पूड स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यासाठी 1 चमचा लिंबाच्या सालीची पूड घेऊन त्यामध्ये 1 चमचा मध मिसळून पेस्ट बनवा आणि स्ट्रेच मार्क्स आणि त्यांच्या आजूबाजूच्या भागांवर हलक्या हातांनी स्क्रब करा.

हे वाचा -  Cold Water : पाणी पिताना अनेकजण ही एक चूक करतात; नंतर अनेक आरोग्य समस्या मागे लागतात

बटाटे वापरा

बटाटा त्वचेसाठी ब्लीचिंग एजंट म्हणून काम करतो. याच्यामुळं त्वचेवरील डागांपासून मुक्ती मिळते. तसंच, त्वचा सैल पडत नाही. तेव्हा, 1 चमचा बटाट्याच्या रसात 1 चमचा कोरफड किंवा अ‌ॅलोवेरा जेल मिसळा आणि स्ट्रेच मार्क्सवर रोज लावा. यामुळं या खुणा कमी होत जातील.

एरंडेल तेलानं मसाज करा

स्ट्रेच मार्क्स हलके करण्यासाठी एरंडेल तेल खूप उपयुक्त आहे. त्वचेला टवटवीत ठेवण्यासही याची मदत होते. त्यामुळं रोज रात्री झोपण्यापूर्वी एरंडेल तेल गरम करून स्ट्रेच मार्क्सवर हलक्या हातांनी मसाज करा. एरंडेल तेल उपलब्ध नसल्यास, आपण ऑलिव्ह तेल देखील वापरू शकता.

हे वाचा - Sprouted garlic: लसणाला कोंब आले म्हणून लगेच फेकू नका; आरोग्यासाठी त्याचे आहेत दुप्पट फायदे

रेटिनॉल क्रीम लावा

स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी तुम्ही रेटिनॉल क्रीम देखील वापरू शकता. यामध्ये आढळणारं व्हिटॅमिन सी स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. याशिवाय दूध, दही, अंडी, चीज आणि फिश ऑइल हे रेटिनॉलचे चांगले स्रोत मानले जातात.

(सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips