नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : डाळी हे अतिशय आरोग्यदायी अन्न आहे. डाळी आपण रोजच्या आहारात घ्यायला हव्या. शाकाहारी लोकांसाठी डाळी हे उच्च प्रथिनयुक्त अन्न आहे आणि ते पोटासाठी खूप फायदेशीर आहे. विविध प्रकारच्या डाळी (pulses) खायला हव्या. त्या चवदार (tasty) असतात आणि शिवाय पौष्टिकही (healthy). शरीराला आवश्यक असलेली प्रथिनं (proteins)आणि इतर पोषकत्त्वं डाळीतून भरपूर प्रमाणात मिळतात. डाळ खाल्ल्यानं ऊर्जा जास्त काळ टिकून राहते. लवकर भूक लागत नाही. पण, डाळ बनवताना आपल्यापैकी अनेकजण काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेत नाहीत. त्यामुळे डाळींचे सर्व फायदे आपल्याला मिळत नाहीत, त्यामुळे आपण आजारांनाही बळी पडू लागतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार डाळी बनवताना होणाऱ्या चुकांविषयी जाणून घेऊया. डाळी कशा खाव्यात: करिश्मा कपूर आणि इतर अनेक सेलिब्रिटींच्या आरोग्य तज्ज्ञ असलेल्या रुजुता दिवेकर यांनी डाळी खाण्याच्या नियमांबद्दल झी न्यूज ला माहिती दिली आहे. 1. डाळी बनवण्याची पद्धत : अंकुरित डाळी रुजुता दिवेकर सांगतात की, डाळी बनवण्यापूर्वी त्या भिजवून किंवा अंकुरित करून घ्याव्यात. यामुळे पौष्टिकता कमी करणारे विरोधी पोषक घटक निघून जातात आणि एन्झाईम्स योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. डाळींमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे तसेच काही पोषक घटक असतात. ज्यामुळे पोटात गॅस, अपचन आणि पोट फुगण्याची समस्या निर्माण होते. 2. डाळी अशा प्रकारे भात आणि इतर पदार्थांसोबत खा तज्ज्ञांच्या मते, तांदूळ आणि इतर धान्यांसोबत डाळी खाताना गुणोत्तराची काळजी घ्यावी. जर तुम्ही डाळ आणि तांदूळ खात असाल तर त्याचे प्रमाण 1:3 ठेवा आणि इतर धान्यांसोबत त्याचे प्रमाण 1:2 असावे. कारण, डाळीमध्ये असलेले आवश्यक अमीनो अॅसिड तांदूळ किंवा तृणधान्यांमध्ये आढळणाऱ्या अमिनो अॅसिडशिवाय अपूर्ण असतात आणि त्यामुळे फायदे मिळू शकत नाहीत. हे अमीनो अॅसिड केस अकाली पांढरे होणे, कमकुवत हाडे आणि रोगप्रतिकारशक्ती यासाठी फायदेशीर आहेत. हे वाचा - लाल, निळा की काळा? रंगाच्या आवडीवरून समजतं तुमची Personality कशी आहे 3. दर आठवड्याला 5 प्रकारच्या डाळी, दर महिन्याला 5 वेगवेगळ्या प्रकारे खा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आपल्याकडे डाळींचे अनेक रंग आणि प्रकार आहेत. ज्यामध्ये पोषण आणि फायदे देखील भिन्न आहेत. तुम्ही एका आठवड्यात 5 प्रकारच्या डाळी खा. पापड, डाळ, खिचडी, हलवा, लाडू, डोसा इत्यादी सुमारे 5 प्रकारे आपण डाळी खाऊ शकतो. हे वाचा - लग्नापूर्वी जोडीदाराची ही एक गोष्ट चेक करायला विसरू नका; भविष्यात होतो पश्चाताप (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)