जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लाल, निळा की काळा? रंगाच्या आवडीवरून समजतं तुमची Personality कशी आहे

लाल, निळा की काळा? रंगाच्या आवडीवरून समजतं तुमची Personality कशी आहे

लाल, निळा की काळा? रंगाच्या आवडीवरून समजतं तुमची Personality कशी आहे

एखाद्या व्यक्तीला लाल किंवा निळा रंग आवडत असल्यास, यातूनही त्याच्याबद्दलही अनेक रहस्यं उलगडू शकतात. चला, जाणून घेऊ रंग (Colour and Personality) तुमच्याबद्दल काय सांगतात?

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : रंगांच्या बाबतीत प्रत्येकाची निवड वेगळी असते. मानसशास्त्रज्ञांच्या मते, रंगांच्या आधारे एखाद्याचं व्यक्तिमत्त्व (Personality) सांगता येतं. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला लाल किंवा निळा रंग आवडत असल्यास, यातूनही त्याच्याबद्दलही अनेक रहस्यं उलगडू शकतात. चला, जाणून घेऊ रंग (Colour and Personality) तुमच्याबद्दल काय सांगतात? लाल (Red) हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, अनेकांना लाल रंग आवडतो. ज्या लोकांना हा रंग आवडतो, ते बहुतेक बहिर्मुखी, आशावादी, उत्साही आणि आत्मविश्वासपूर्ण असतात. हे लोक नेहमी सखोल ज्ञानाची इच्छा बाळगतात आणि त्यांचं ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, लाल रंग आवडणारे बहुतेक लोक तार्किक असतात. ते चांगले नेते असू शकतात. ते नेहमी तीक्ष्ण विचार करणारे असतात. जोखीम घेऊ शकतात आणि बहुतेक प्रबळ इच्छाशक्तीचे असतात. निळा (Blue) निळा रंग आवडणारे लोक सखोल विचार करणारे असतात. हे लोक स्वभावानं अतिशय विश्लेषणात्मक/चिकित्सक असतात. कोणतीही घाई न करता कोणतंही काम करण्यासाठी ते आपला वेळ देतात. तर्कशास्त्र आणि तथ्यं आवडणारे असतात. या लोकांना गोष्टी लपवालपवी आणि बनावट गोष्टी आवडत नाहीत. निळ्या रंगाच्या प्रेमींसोबतचा कोणताही व्यवहार तार्किपणे केला पाहिजे. हिरवा (Green) हिरवा रंग आवडणाऱ्या लोकांचं व्यक्तिमत्त्व खूप वेगळं असतं. ते निश्चिंत, शांत आणि प्रत्येक बाबतीत नेहमीच धीर धरतात. या लोकांचा कोणत्याही गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. सकारात्मक वागण्याव्यतिरिक्त, ज्या लोकांना हिरवा रंग आवडतो ते कमी रागावतात. हे वाचा -  Mangal Gochar: मंगळ ग्रह मकर राशीत करतोय प्रवेश; या 4 राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार पिवळा (Yellow) हा रंग आवडणाऱ्या लोकांसोबत प्रत्येकाला हँग आउट करायला आवडतं. हे लोक अतिशय मैत्रीपूर्ण आणि कल्पनाशील असतात. प्रत्येकाला या लोकांचा उदार आणि सकारात्मक दृष्टीकोन आवडतो. हे लोक कुशाग्र विचार करणारे आहेत आणि त्यांना त्यांच्या विचारांना आणि कल्पनांना दडपलेलं आवडत नाही. हे वाचा -  31 दिवस धोक्याचे! या राशीच्या लोकांनी जरा जपूनच राहा; गुरू ग्रहाचा अस्त संकटं वाढवेल काळा (Black) ज्या लोकांना काळा रंग आवडतो, ते खूप गुप्तता राखणारे असतात. या लोकांच्या स्वभावाबद्दल निश्चितपणे काहीही सांगता येत नाही. या लोकांना खूप लवकर राग येतो. (सूचना: येथे दिलेली माहिती विविध स्त्रोतातून मिळवलेल्या सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात