JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / चमत्कार झाला! जगातील पहिला Super Baby जन्माला आला; आहे खास पॉवर

चमत्कार झाला! जगातील पहिला Super Baby जन्माला आला; आहे खास पॉवर

जगातील पहिल्या सुपरबेबीचा जन्म झाला आहे.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 10 मे : बॅटमॅन, स्पाडरमॅन, सुपरमॅन असे हॉलिवूड फिल्ममधील सुपरहिरो तुम्हाला माहिती आहेत. पण आता खरंच एका सुपरबेबीचा जन्म झाला आहे. जगातील पहिला सुपरबेबी जन्माला आला आहे. या सुपरबेबीकडे एक खास पॉवर आहे. अशी पॉवर आजवर कोणत्याच माणसाकडे नाही. या बाळाच्या जन्माने एक नवा इतिहास रचला आहे. इंग्लंडमध्ये हा सुपरबेबी जन्माला आला आहे. न्यूकॅसल फर्टिलिटी सेंटरमध्ये या बाळाचा जन्म झाला. या बाळामध्ये तीन व्यक्तींचं डीएनए आहे. त्याच्या शरीरात त्याच्या आईबाबांच्या डीएनएशिवाय आणखी एका तिसऱ्या व्यक्तीचं डीएनएही जोडण्यात आलं आहे. त्यामुळे हा बेबी सुपरबेबी बनला आहे.

या सुपरबेबीला असा कोणताही जेनेटिक आजार होणार नाही, ज्यावर उपचार शक्यच नाही. OMG! बकरीने दिला अशा पिल्लाला जन्म की पाहण्यासाठी लोकांची गर्दी; VIDEO जगभर व्हायरल ज्या पद्धतीने या बाळाचा विकास करम्यात आला आहे, ती माइटोकॉन्ड्रियल डोनेशन ट्रिटमेंट आहे.  या बाळासाठी निरोगी महिलेच्या एग्जमधून टिश्यू घेऊन आयव्हीएफ भ्रूण तयार केल. हे भ्रूण ज्या महिलेच्या गर्भात वाढलं, त्या महिलेच्या जेनेटिक आजारांपासून ते सुरक्षित आहे. म्हणजे आईच्या शरीरात होणाऱ्या आजारांचा याच्यावर काहीही परिणाम होणार नाही. ना त्याला हे आजार होणार. हे काय? 6 वर्षांच्या विद्यार्थ्याचं ड्रॉईंग पाहून शिक्षकांना फुटला घाम, बोलावली एमर्जन्सी मीटिंग त्याच्या शरीरात नुकसानकारक अस जेनेटिक म्युटेशन होणार नाही, असा दावा केला जातो आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या