बाली, 10 मे : सामान्यपणे माणूस, प्राणी, पक्षी यांच्या शरीराची एक ठराविक रचना असते. पण काही प्रकरणं अशी आहेत, जी याला अपवाद ठरतात. असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. एका बकरीने विचित्र पिल्लाला जन्म दिला आहे. या पिल्लाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे आणि त्याला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे. बकरीचं असं पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. जगभर या पिल्लाची चर्चा होते आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, इंडोनेशियातील ही घटना आहे. पांडन इंदाहच्या सेंट्रल लोम्बोक रिजेंसीमध्ये 7 मे रोजी एका बकरीने काही पिल्लांना जन्म दिला. त्यातील एक पिल्लू खूप वेगळं होतं.
या बकरीला प्रत्यक्षात पाहणाऱ्या एका व्यक्तीने स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले की, ते बकरी पाहण्यासाठी गेले होते. त्याला फक्त एक डोळा होता आणि त्याच्या अंगावर केस नव्हते. ती खूप विचित्र दिसत होती आणि रंग पण वेगळा होता. त्याला दाढी होती आणि त्याच्या कपाळावर एक मोठा डोळा होता. ती माणसासारखी दिसत होती.
याला म्हणायचं काय? कबुतराला पाहून सर्व हैराण; तुम्ही सांगू शकता का याचं नाव?
तिच्या पोटी जन्मलेली बाकीची मुलं सामान्य होती, पण तिचं स्वरूप वेगळं होतं. हे पिल्लू फक्त 20 मिनिटे जिवंत राहू शकलं, नंतर त्याचा मृत्यू झाला.
फोटो सौजन्य - CEN
सेंट्रल लोम्बोक अॅग्रिकल्चरल एजन्सीचे तौफिकुर्रहमान यांनी सांगितलं की, जन्मदोषासह ही बकरीचं पिल्लू जन्माला आलं. त्याला साइक्लोपिया होता. त्यामुळे त्याचा चेहरा असा होता. त्याचे डोळे दोन भागात विभागले गेले नव्हते. Real Tom & Jerry Video : इवलासा उंदीर मांजरावर भारी; पाहा रिअल ‘टॉम अँड जेरी’ची जबरदस्त फाइट याआधीही अशी काही प्रकरणं समोर आली आहेत. अशा प्राण्यांचा मृत्यू लवकर होतो.