JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / शारीरिक संबंधांनंतर लघवी करणं का गरजेच? होऊ शकतो हा आजार

शारीरिक संबंधांनंतर लघवी करणं का गरजेच? होऊ शकतो हा आजार

शारीरिक संबंधांनंतर लघवी करणं का गरजेच असत? याचा काय फायदा होतो? किंवा लघवी न केल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात हे जाणून घेऊयात.

जाहिरात

शारीरिक संबंधांनंतर लघवी करणं गरजेच! अन्यथा होऊ शकतो हा आजार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शारीरिक संबंधांबद्दल आजही समाजात खुलेपणाने चर्चा होत नाही. त्यामुळे माहितीचा अभाव असल्याने जोडप्याकडून अनेक चुका होतात आणि या चुकांचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. शारीरिक संबंधांनंतर लघवी अथवा मूत्रविसर्जन करणे आवश्यक असते असे म्हणतात. परंतु याविषयी जोडप्यांच्या मनात अनेक संभ्रम असतो. तेव्हा शारीरिक संबंधांनंतर लघवी करणं का गरजेच असत? याचा काय फायदा होतो? किंवा लघवी न केल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात हे जाणून घेऊयात. शारीरिक संबंधांनंतर अथवा दैनंदिन जीवनात देखील प्रायव्हेट पार्टसची स्वच्छाता ठेवणे महत्वाचे आहे. काही लोक शारीरिक संबंधानंतर लघवीला न जाता तसेच झोपून जातात. परंतु असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लघवी न केल्यास संसर्ग होण्याचा धोका असतो. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना याचा जास्त त्रास होऊ शकतो. डॉक्टर आणि तज्ञांच्या सांगण्यानुसार महिलांचा मूत्रमार्ग लहान असलयाने त्यात जिवाणू अगदी सहजपणे मूत्राशयात जाऊ शकतात. त्यामुळे स्त्रियांनी लघवी न केल्यास मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो.

शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी आणि नंतर लघवी करावी : शारीरिक संबंधांपुर्वी जर लघवी झाली असेल तर आधी लघवी करूनच शारीरिक संबंध ठेवावे. तसेच जोडीदारासोबत शारीरिक संबंधांनंतर लघवी करणे अधिक महत्वाचे असते. कारण लघवी केल्याने युरिनरी ट्रॅकमधील बॅक्टेरिया निघून जातात तसेच यानंतर त्याची स्वच्छता करणे देखील गरजेचे आहे. असे न केल्यास  मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो.  हे स्त्री आणि पुरुष दोघांनाही लागू होते. Diabetes Symptoms : पायांवर ही 6 लक्षणं दिसू लागल्यास समजून जा, तुमचा डायबिटीज वाढला! युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचा धोका : शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लघवी आणि प्रायव्हेट पार्टची साफसफाई न केल्यास युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच UTI होण्याचा धोका असतो. अनेक महिलांना शारीरिक संबंधांनंतर युरिन इन्फेक्शनच्या समस्येला सामोरे जावे लागते. याच कारण म्हणजे शारीरिक संबंधांनंतर बॅक्टेरिया प्रायव्हेट पार्टमध्ये प्रवेश करतात आणि यामुळे बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे महिलांनी यानंतर लगेचच लघवी करावी. पुरुषांना बॅक्टेरियाचा धोका खूप कमी असतो, त्यामुळे त्यांना लघवी करण्याची विशेष गरज नसते. परंतु तरीही त्यांनी प्रायव्हेट पार्टची स्वच्छता राखणे गरजेचे असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या