दैनंदिन जीवशैली, खाण्यापिण्याच्या सवयी इत्यादींमुळे जगभरात डायबिटीज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पूर्वी केवळ उतारवयातील लोकांना होणारा हा आजार आता तरुणांना देखील आपले लक्ष करू लागला आहे. डायबिटीज या आजारात शरीर इन्सुलिनची निर्मिती किंवा त्याचा प्रभावीपणे वापर करण्यास असमर्थ झाल्यामुळे रक्तातील साखरेची वाढते. रक्तातील साखरेची पातळी वारंवार वाढली की पायांसह अनेक अवयवांना त्याची लक्षण दिसून येतात. तेव्हा डायबिटीज वाढल्यास पायांवर कोणती लक्षण दिसून येतात याची माहिती करून घेऊयात. मुंग्या येणे : डायबिटीज वाढल्यास पायांना मुंग्या येणे, जळजळ होणे, सुन्नता येणे अशी लक्षण जाणवतात. तसेच रुग्णांना त्यांच्या पायावरील जखम शोधण्यास अडचण येते. तसेच या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास संक्रमण आणि अल्सर होण्याचा धोका असतो. अपुरा रक्तपुरवठा : रक्तातील साखरेची उच्च पातळी रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकते. ज्यामुळे पायातील रक्ताभिसरण कमी होऊन पायात पेटके येणे, पाय दुखणे, अशक्तपणा येणे अशी लक्षण जाणवू लागतात. यावर वेळीच उपचार न केल्यास PAD मुळे गँगरीन सारखी गंभीर गुंतागुंत होऊ शकते आणि त्याचे विच्छेदन देखील होऊ शकते.
पायावर व्रण उठणे : न्यूरोपॅथी आणि खराब रक्ताभिसरणामुळे पायात अल्सर होऊ शकतो. तेव्हा अशी लक्षण आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करा. कोरडेपणा आणि बुरशी येणे : डायबिटीज वाढल्यावर त्वचा कोरडी होऊन त्यावर तडे पडू शकतात. तसेच अनेकदा रुग्णांच्या पायांवर बुरशीजन्य किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका असतो. Kitchen Tips : सुकलेला कढीपत्ता फेकून देता? थांबा असा करा त्याचा वापर लालसरपणा आणि सूज : डायबिटीजमुळे अनेकदा हाडे कमकुवत होऊन सांधे दुखीची समस्या जाणवते. त्यामुळे पाय फ्रॅक्चर होणे किंवा तो निखळणे अशा गोष्टी होऊ शकतात.