JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Monsoon Tips : पावसाळ्यात पायांना फंगल इंफेक्शनचा धोका! 5 उपाय करा समस्येपासून दूर राहा

Monsoon Tips : पावसाळ्यात पायांना फंगल इंफेक्शनचा धोका! 5 उपाय करा समस्येपासून दूर राहा

फंगल इंफेक्शनमुळे पायांना जळजळ, खाज उठणे, फोड्या येणे, पायाची साल निघणे अशा अनेक समस्या उद्भवतात. तेव्हा पावसाळ्यात फंगल इंफेक्शन पासून वाचायचं असेल तर कशी काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊयात.

जाहिरात

पावसाळ्यात पायांना फंगल इंफेक्शनचा धोका! 5 उपाय करा समस्येपासून दूर राहा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पावसाळा ऋतू अनेक आजारांना आमंत्रण देत असतो. अशावेळी खबरदारी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने त्यातून वाट काढत निश्चित ठिकाण गाठावे लागते. योग्य खबरदारी न घेतल्यास अशा दूषित पाण्यामुळे फंगल इंफेक्शनची समस्या होऊ शकते. फंगल इंफेक्शनमुळे पायांना जळजळ, खाज उठणे, फोड्या येणे, पायाची साल निघणे अशा अनेक समस्या उद्भवतात. तेव्हा पावसाळ्यात फंगल इंफेक्शन पासून वाचायचं असेल तर कशी काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊयात. अँटी इंफेक्शन पावडर : पावसाळ्यात पायांना फंगल इंफेक्शनपासून वाचवायचं असेल तर घराबाहेर पडताना पायाला अँटी इंफेक्शन पावडर लावा. अँटी इंफेक्शन पावडर लावल्यावर त्यावर मोजे घाला आणि त्यावर शूज घाला. तसेच तुम्ही रात्री झोपताना देखील अँटी फंगल लोशन लावू शकता. असे केल्याने पावसाळ्यात पायांमधून येणारे दुर्गंधी दूर होईल आणि पाय फंगल इंफेक्शन पासून देखील दूर राहतील.

नीम तेल : पावसाळ्यात नीम तेल हे फंगल इंफेक्शन कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. नीम तेलाच्या वापरामुळे इंफेक्शन कमी होते, तेव्हा रात्री झोपताना पायांना नीम तेल लावा यामुळे  फंगल इंफेक्शन कमी होण्यास मदत होईल. मेहेंदीच्या पानांची पेस्ट : मेहेंदीच्या पानांची पेस्ट ही फंगल इंफेक्शनवर गुणकारी ठरते. मेहेंदीच्या पानांमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुण असतात जे इंफेक्शन रोखण्यासाठी मदत करतात. मेहेंदीच्या पानांची पेस्ट पायांना लावून ती सुके पर्यंत असेच ठेवा आणि मग धुवून टाका. Coconut Water : नारळपाणी म्हणजे जणू अमृतच! ‘या’ आजारांवर आहे रामबाण टीट्री ऑईल आणि हळद लावा : टीट्री ऑईल आणि हळद हे अनेक इंफेक्शनवर रामबाण उपाय आहे. टीट्री ऑईलमध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात. तेव्हा दिवसातून दोन वेळा तुम्ही हे ऑईल प्रभावित ठिकाणी लावू शकता. तसेच हेल्दीची पेस्ट देखील तुम्ही प्रभावित जागेवर लावल्यास फंगल इंफेक्शन दूर होते. बंद चपला घालू नका : पावसाळ्यात अधिकतर बंद चपला घालणे टाळा. घरी आल्यावर लगेचच साबणाने पाय धुवा यामुळे पावसाळ्यात पायांवर होणारे फंगल इंफेक्शन दूर होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या