नारळातील पाणी हे पोटॅशियम, कॅल्शियम, मॅंगनीज, अँटिऑक्सिडंट्स, अमीनो अॅसिड आणि साइटोकिनिन्स यांसारख्या विविध खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असते.
लठ्ठपणा : बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे सध्या बऱ्याचजणांना वजन वाढणे किंवा लठ्ठपणा सारखी समस्या जाणवते. तेव्हा वजन कमी करण्यासाठी तसेच पोटाची चरबी कमी करण्यासाठी नारळपाणी उपयुक्त ठरू शकते. नारळ पाण्याला तुम्ही रोजच्या आहाराचा भाग बनवल्यावर काही महिन्यात वजन कमी होऊ शकेल.
हाय ब्लड प्रेशर : ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी रोज नारळाच्या पाण्याचे सेवन करावे, यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होते आणि त्यामुळे बीपी हळूहळू सामान्य होतो.
हृदय रोग : सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे बऱ्याच जणांना हृदयासंबंधित आजार होतात. तेव्हा नारळपाण्याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, कोरोनरी धमनी रोग आणि ट्रिपल वेसल डिसीजचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते : कोणत्याही आजाराशी सामना करायचा झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती नीट राहणे जरुरी असते. तेव्हा नारळपाण्याचे नियमित सेने केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अनेक आजारांशी सहज लढू शकतो.