JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / घशात खवखव, पायात तीव्र वेदना आणि तरुणाचा गेला जीव; डॉक्टरांनाही मृत्यूनंतर समजलं धक्कादायक कारण

घशात खवखव, पायात तीव्र वेदना आणि तरुणाचा गेला जीव; डॉक्टरांनाही मृत्यूनंतर समजलं धक्कादायक कारण

घशात खवखव होण्याची समस्या असलेल्या तरुणाच्या नेमक्या आजाराचं निदान सुरुवातीला डॉक्टरांनाही झालं नाही.

जाहिरात

घशाची खवखव ठरली जीवघेणी (प्रतीकात्मक फोटो/ सौजन्य - Canva)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 22 फेब्रुवारी : आपल्यापैकी बऱ्याच जणांना कधी ना कधी घशाची समस्या उद्भवते. विशेषतः घशात खवखव जाणवते. घशाच्या खवखवीची तशी बरीच कारणं आहेत, त्यापैकी काही गंभीर आजाराचे किंवा गंभीर समस्येचं हे एक लक्षणही आहे. पण बऱ्याचदा आपण घशाची खवखव सामान्य समजतो आणि घरच्या घरीच काही ना काही उपाय करतो. पण अशीच घशाची खवखव एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. डॉक्टरांनाही सुरुवातीला घशाची खवखव सामान्य समजून त्यावर उपचार केले. शेवटी घशाच्या खवखवीसह पायात तीव्र वेदना झाल्या आणि तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर डॉक्टरांना धक्कादायक कारण समजलं. ल्युक अब्राहम असं या मृत तरुणाचं नाव आहे.  20 वर्षांच्या ल्युकला घशात खवखव जाणवत होती. त्यासोबत त्याला इतर सामान्य लक्षणंही होती. तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनाही त्याच्या नेमक्या आजाराचं निदान झालं नाही. त्यांनी त्याला टॉन्सिलची समस्या समजून तसे उपचार केले आणि औषधं दिली. त्याला बरं वाटलं नाहीच पण तीन दिवसांत त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या समस्येचं धक्कादायक कारण समोर आलं. हे वाचा -  पायाची किरकोळ दुखापत 11 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतली; मृत्यूचं कारण धक्कादायक डेली स्टारच्या रिपोर्टनुसार त्याला गेल्या महिनाभरापासून घशात खवखव होत होती. डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरांनी त्याला काही अँटिबायोटिक्स दिले. औषधांचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. उलट त्याच्या पायात वेदना वाढू लागल्या. त्याची प्रकृती अधिकच गंभीर झीली त्यानंतर त्याला नॉर्थम्पटन जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण ऑपरेशन टेबलवरच 23 जानेवारीला त्याचा मृत्यू झाला. मृत्यूआधी त्याच्या पायात तीव्र वेदना होत होत्या. त्यासाठी त्याला डॉक्टरांच्या सल्लानुसार पेनकिलर देण्यात आली होती.

पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून त्याच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं. डॉक्टर ज्याला सामान्य टॉन्सिल समजत होते, तो खरंतर Lemierre syndrome  होता. त्याला फ्लेश इटिंग डिसीज झाला होता. हे वाचा -  आश्चर्य! 24 वर्षे फक्त एका फळावर जगतेय ही व्यक्ती; आजारातूनही ठणठणीत झाल्याचा दावा हे एक बॅक्टेरिअल इन्फेक्शन आहे. जे रक्त आणि नसांवर परिणाम करतं. जेव्हा हे इन्फेक्शन वाढतं तेव्हा रक्ताच्या गुठळ्या होतात आणि लिव्हर, किडनी असे अवयव निकामी होऊ लागतात. लक्षणं दिसल्यानंतर ब्लड टेस्टमार्फत या आजाराचं निदान होऊ शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या