जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आश्चर्य! 24 वर्षे फक्त एका फळावर जगतेय ही व्यक्ती; आजारातूनही ठणठणीत झाल्याचा दावा

आश्चर्य! 24 वर्षे फक्त एका फळावर जगतेय ही व्यक्ती; आजारातूनही ठणठणीत झाल्याचा दावा

एका फळावर जगणारी व्यक्ती.

एका फळावर जगणारी व्यक्ती.

आजाराला वैतागलेल्या या व्यक्तीने सर्वकाही खाणं सोडलं आणि गेली 24 वर्षे फक्त एक फळ खात राहिली. आता ती फिट अँड फाइन आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 18 फेब्रुवारी : आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्या शरीराला वेगवेगळ्या घटकांची गरज असते. त्यासाठी आपल्या आहारात वेगवेगळ्या पदार्थां चा समावेश करावा लागतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक व्यक्ती जी गेली 24 वर्षे फक्त एकाच फळावर जगते आहे. इतकंच नव्हे तर ही व्यक्ती एका समस्येने त्रस्त होती ती समस्याही दूर झाली आणि आता आपण हेल्दी आणि फिट असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. बालाकृष्णन असं या व्यक्तीचं नाव आहे.  हेल्दी आणि फिट राहण्यासाठी लोक काय काय नाही करत. खास डाएट फॉलो करतात. एक्सरझाइझ करतात. पण बालाकृष्णन यांनी स्वतःसाठी एक खास डाएट बनवला आहे. असा डाएट ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल आणि त्याचे फायदे वाचूनही हैराण व्हाल. हे वाचा -  गॅस…लॉक…खत्म…! पोटातील गॅसवरील विचित्र उपचाराचा हा VIDEO पाहूनच चक्रावाल अभिनेत्री आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर शेनाज ट्रेजरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बालाकृष्णन यांच्या डाएटबाबत माहिती दिली आहे. तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ती बालाकृष्णन यांच्याशी बोलते आहे. कॅप्शनमध्ये तिने म्हटलं आहे, ‘बालाकृष्णन आणि त्यांच्या चांगल्या आरोग्याला आमचा सलाम’

News18लोकमत
News18लोकमत

बालाकृष्णन गेली 24 वर्षे कोकोनट डाइटवर आहेत. म्हणजे ते फक्त नारळ खातात आणि नारळपाणी पितात. बाळाकृष्णन फक्त कोकोनट डाएटवर आहेत, याचं कारण म्हणजे एक आजार.  त्यांना पोटातील गॅसची समस्या होती. त्यांच्या शरीरात ताकदच राहिली नव्हती. ते या समस्येला इतके वैतागले की अखेर त्यांनी स्वतःच आपण आजपासून फक्त कोकोनट डाएट घेणार असं ठरवलं. तेव्हापासून ते हा डाएट फॉलो करत आहेत. हे वाचा -  Shocking! घास तोंडात आणि शरीराने सोडले प्राण, व्यक्तीचा जेवताना अचानक गेला जीव; मृत्यूचा LIVE VIDEO बालाकृष्णन यांनी सांगितलं, सध्या जसं त्यांचं आरोग्य आहे, तसं आधी कधीच नव्हतं. कोकोनट डाएटमुळे त्यांना आराम मिळाला. त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली. व्हिडीओतही तुम्ही बालाकृष्णन यांना पाहू शकता. ते एकदम ठणठणीत दिसत आहे. वयस्कर असूनही त्यांच्या चेहऱ्यावर चमक दिसते आहे.

जाहिरात

शेनाजने या व्हिडीओत कोकोनट डाएटचे फायदेही सांगितले आहेत.  नारळात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सोडियम, पोटॅशिअम असे पोषक तत्व असतात. न्यूट्रिएंट्समुळे त्यांच्या शरीरातील ताकद परत आली आणि ते आज तंदरूस्त आहेत.

पण फक्त नारळ खाऊन आणि नारळपाणी पिऊन इतके वर्षे कोण कसं काय जगू शकतं, हे अविश्वसनीय आहे. असं बहुतेक युझर्सनी म्हटलं आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात