प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 21 जून : निरोगी आणि सुदृढ शरीर राहण्यासाठी व्यायाम आणि योग प्रत्येकासाठी उपयोगी माध्यम आहे. त्यामुळे योगासनं करण्याचं प्रमाण आता वाढत आहे. योगाचे काही प्रकार हे महिलांसाठीही उपयुक्त आहेत. आपण घरातील स्वयंपाक करणे, भांडी घासणे आणि अन्य कामं केली की व्यायाम झाला असा काही गृहिणींचा समज असतो. पण, या कामांना शरिराला हवा तो व्यायाम मिळत नाही. गृहिणींनी देखील काही योगासनं केली पाहिजेत, असं मत पुण्यातील योग प्रशिक्षक मिलिंद सिद्दीड यांनी व्यक्त केलंय. महिलांनी कोणती आसनं करावीत? मिलिंद सिद्दीड हे गेल्या 14 वर्षांपासून पुण्यात योग प्रशिक्षक म्हणून काम करतात. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त त्यांनी महिलांना आरोग्यासाठी खास टिप्स दिल्या आहेत. ‘घरातील हाऊसवाईफ किंवा गृहिणींची दिवसभर काहीतरी कामं सुरू असतात. त्यामध्ये त्यांची शारीरिक हलचाल होत असते. माझं दिवसभर व्यस्त रुटीन आहे. मला व्यायामाची गरज काय? असा प्रश्न या गृहिणी विचारतात, असा अनुभव आहे. त्यांचा हा समज चुकीचा आहे.
कोणते आसन करावे? सूर्यनमस्कार हा संपूर्ण व्यायाम प्रकार आहे. योगासनतील सर्वात महत्त्वाचे आसन म्हणजे सूर्यनमस्कार. यामध्ये डोक्यापासून ते पायापर्यंत तुमच्या संपूर्ण शरीराची हालचाल एका विशिष्ट पद्धतीनं केली जाते. अर्ध मच्छिंद्रासन करणेही महिलांसाठी फायदेशीर आहे. त्यामध्ये पाठीच्या कण्याच्या पूर्ण हालचाली होतात. तसंच मानेचाही व्यायाम होतो. त्याचबरोबर पश्चिमोत्तासन किंवा आकर्ण धनुरासन, पद्मासन हे प्रकार देखील महिलांसाठी उपयोगी आहेत, असे सिद्धीड यांनी स्पष्ट केलं. म्हातारपणामुळे शरीर थकलंय? ‘ही’ सोपी योगासनं करा आणि राहा फिट, Video दिवसभराचं काम आणि व्यायाम यामध्ये बराच फरक आहे. महिलांनी योगाभ्यास केला तर दिवसभराचं काम त्यांना आणखी परिणामकारक करता येईल. तुमची एनर्जी लेव्हल देखील यामध्ये वाढू शकते, त्यामुळे गृहिणींनी योगाभ्यास करणे हे आवश्यक आहे, असं सिद्दीड यांनी सांगितलं.