जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Yoga Day 2023 : म्हातारपणामुळे शरीर थकलंय? ‘ही’ सोपी योगासनं करा आणि राहा फिट, Video

Yoga Day 2023 : म्हातारपणामुळे शरीर थकलंय? ‘ही’ सोपी योगासनं करा आणि राहा फिट, Video

Yoga Day 2023 : म्हातारपणामुळे शरीर थकलंय? ‘ही’ सोपी योगासनं करा आणि राहा फिट, Video

वृद्ध व्यक्तींच्या हालचालींवर वयानुसार मर्यादा आलेली असते. त्यांनी कोणती योगासनं करावीत? पाहूया…

  • -MIN READ Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
  • Last Updated :

भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली 20 जून : आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या योग शास्त्राला हजारो वर्षांची परंपरा आहे. सध्याच्या धावपळीच्या काळात योगासनाचं महत्त्व आणखी वाढलंय. लहान मुलापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनी सदृढ आरोग्यासाठी योगासनं केली पाहिजेत. पण, वृद्ध व्यक्तींच्या हालचालींवर वयानुसार मर्यादा आलेली असते. शारीरिक व्याधीमुळे त्यांची क्षमता देखील कमी होते. त्यांनी कोणते योगासानं करावेत याची माहिती डोंबिवलीतील राजेंद्र आचार्य यांनी दिलीय. पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार आचार्य गेली 35 वर्ष योगासनं करत आहेत. योगासनाची तयारी 21 जून हा दिवस इंटरनॅशनल योगा डे म्हणून साजरा केला जातो. योगाभ्यासाची भारतीय परंपरा सध्या सर्व जगभरात पसरली आहे. घरच्या घरी सोप्या पद्धतीने योगा केल्यानं आरोग्य उत्तम राहते. योगा करायला बसताना खाली एक चादर किंवा मॅट घालावी. त्यानंतर दोन्ही पायात अंतर ठेवावे. पाठ ताठ ठेवत खांदे देखील सरळ रेषेत असावे आणि दोन्ही हात जमिनीकडे टाकलेले असावे. वयोवृद्ध व्यक्तींना असे बसवत नसेल तर त्यांनी भिंतीचा आधार घेऊन टेकावे.

News18लोकमत
News18लोकमत

 ‘हे’ प्रकार करा आणि फिट रहा पादसंचालन - गुडघ्याचे स्नायू लवचिक राहतात. हा योगाचा प्रकार करताना आपल्या पायांची गुडघ्यापासून हालचाल होणे गरजेचे असते. अगदी साधा आणि सोपा योगा प्रकार आहे. उत्थित एक पादासन - योगा प्रकारात पोटाचे स्नायू ताणले जातात यामुळे पोटाचे स्नायू कार्यक्षम होतात. हा योगा प्रकार करताना एक पाय हळूहळू आपल्या क्षमतेप्रमाणे गुडघ्यात न दुमडता वरती घेणे आवश्यक असते. हस्तासन - या प्रकारात हृदयाचे कार्य चांगले राहते आणि हातांचे स्नायू भक्कम होतात. फिट व्हायचंय पण व्यायामाचा कंटाळा; बेडवरच करा ही 3 योगासनं, वजन घटण्यास होईल सुरुवात अर्ध उत्तान ताडासन - यामुळे शरीर ताणले जाते. रक्तवाहिन्या कार्यक्षम होतात. हा प्रकार करताना एक पाय गुडघ्यातून फोल्ड करायचा आणि त्याच पायाच्या रेषेतील हात वरती करून स्नायूंना ताण देणे आवश्यक असते. उत्थान ताडासन - या आसनामुळे मणक्याचे आरोग्य सुधारते. हा प्रकार करताना दोन्ही हात आपल्या क्षमतेनुसार वरती घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. अर्ध पवन मुक्तासन - या आसनामुळे पचन आणि उत्सर्जन क्षमता वाढते. हे आसन करताना पाय गुडघ्याकडून दुमडून घ्यावा त्यानंतर तो हळूहळू पोटाकडे घेऊन येण्याचा प्रयत्न करावा याचवेळी आपल्या दोन्ही हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफण करून त्या पायाच्या गुडघ्यावर ठेवावी . आणि मानेचा कोणताही त्रास नसल्यास मन थोडी उचलण्याचा प्रयत्न करावा. बाबा रामदेवांनी सांगितलेल्या या 4 योगासनांमुळे केसगळतीला लागेल ब्रेक उत्तान भद्रासन - या आसनामुळे मधुमेह आणि प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास सुसह्य होतो. हे आसन करताना दोन्ही हात डोक्याखाली स्थिर ठेवावे. दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडावे आणि त्यानंतर तळवे पायाचे तळवे एकमेकांना फुलपाखराच्या पंखाप्रमाणे जोडावे . वामंगासन - श्वसन संस्था सुधारते दम्याचा त्रास कमी होण्यास मदत होते. या आसनामध्ये एका कुशीवर वळून एक पाय सरळ आणि एक पाय गुडघ्यात दमडावा. त्यानंतर एक हात सरळ पायाच्या रेषेत ठेवावा आणि दुसरा हात डोक्याच्या खाली गुडघ्याच्या रेषेत दुमडावा. अँट वॉकिंग - या आसनामुळे फ्रोजन शोल्डर होण्याची शक्यता कमी होते. हे असं करताना भिंत पकडावी. भिंतीवर आपल्या हाताची बोटे मुंगी चालते तसे खालती वरती करावी. नेत्र संकोच - या असल्यामुळे डोळ्यांचे स्नायू कार्यक्षम राहतात. डोळे घट्ट बंद करावे आणि उघडावे असे दोन ते तीन वेळा करावे डोळे जितके घट्ट बंद करता येतील तितके बंद करण्याचा प्रयत्न करावा. ‘त्यानंतर ॐकार घेऊन हे योगासने थांबवावी. सर्व योगासनांना अर्धा ते पाऊण तास वेळ जातो.  वयोवृद्ध काळात बराच एकांतपणा आलेला असतो. हा एकांतपणा घालवण्याचे काम योगाच्या माध्यमातून करता येते. सध्या योगाचे अनेक कठीण प्रकार पाहिला मिळतात. अतिरिक्त आणि चुकीच्या पद्धतीने योगा केल्याने देखील शरीराची हानी होते असे आचार्य यांनी सांगितलं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात