डायबिटीजच्या रुग्णांनी पावसाळ्यात घ्या 7 गोष्टींची काळजी, अन्यथा धोका वाढलाच म्हणून समजा
पावसाळा येताना त्याच्यासोबत अनेक आजार देखील घेऊन येत असतो. हवामानात बदल होत असताना त्याचा सर्वच जीवांच्या आरोग्यावर परिणाम होतो, मात्र याचा डायबिटीजच्या रुग्णांवर अधिक परिणाम झालेला दिसून येतो. रक्तातील साखर वाढल्यामुळे डायबिटीज रुग्णांची प्रतिकार क्षमता इतरांच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे त्यांना पावसाळ्यात अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तेव्हा डायबिटीज रुग्णांनी पावसाळ्यात त्यांच्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेऊयात. बाहेरचे खाणे टाळा : पावसाळ्यात डायबिटीजच्या रुग्णांनी खाण्यापिण्याच्या बाबतीत स्वच्छता राखायला हवी. याकाळात झालेलया छोट्याशा चुकीमुळे तुमचा आजार वाढू शकतो. त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांना पावसाळ्यात बाहेरचे अन्न खाणे टाळले पाहिजे. घरचे ताजे अन्न खाणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. संसर्ग टाळण्याचा हा सर्वोत्तम पर्याय आहे. फळं आणि भाज्यांना नीट स्वच्छ करा: खरंतर हा नियम सर्वांसाठी लागू होतो, पण डायबिटीज असलेल्या रुग्णांनी याची अधिक काळजी घ्यावी. डायबिटीजच्या रुग्णांनी बाहेरून आणलेल्या फळ आणि भाज्या स्वच्छ धुवाव्यात. बाहेरून आणल्यावर भाजी आणि फळांना गरम पाण्यात लिंबू घालून त्यात थोडावेळ ठेवावे. जेणेकरून त्याच्यावर असलेले बॅक्टेरिया मरून जातील.
कच्चे अन्न खाणे टाळा : पावसाळ्यात कच्च्या अन्नाचे सेवन करणे डायबिटीजच्या रुग्णांनी टाळावे कारण हे त्यांच्यासाठी फार नुकसानदायी ठरू शकते. सूक्ष्मजंतू कच्च्या भाज्यांमध्ये राहण्याची शक्यता असल्याने, त्या खाण्यापूर्वी भाज्या वाफवणे किंवा शिजवणे चांगले असते. शरीर कोरडे ठेवा : तुम्ही डायबिटीजचे रुग्ण असाल तर सहसा पावसात भिजण टाळा. यादिवसात प्रयत्न करा की तुम्ही शरीरावर नेहमी सुकलेले कपडे आणि शूज वापराल. मधुमेह असलेल्या रुग्णांना या दिवसात पायाला जखम होऊन त्यातून संसर्ग होण्याचा धोका असतो. तेव्हा यादिवसात अधिक काळजी घ्या. स्वच्छतेची काळजी घ्या : पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि वायरसचा धोका अधिक असतो. तेव्हा डायबिटीजच्या रुग्णांनी नियमित शरीराची स्वच्छता राखली पाहिजे. आजारांचे संक्रमण रोखण्यासाठी वारंवार हात धुवा. तसेच डायबिटीजच्या रुग्णांनी त्यांच्या हाताची नखे कापा त्यामुळे नखांमध्ये घाण साचणार नाही आणि कोणता आजार उद्भवणार नाही. Cleaning Tips : पावसाळा सुरु झाला की बाथरूममध्ये गांडूळ येतात? मग करा हे सोपे उपाय पाण्याचे सेवन करा : पावसाळ्यात डायबिटीजच्या रुग्णांनी स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याचे सेवन करावे. पावसाळयात रुग्णांनी कार्बोनेटेड पेये आणि पॅकेट फूड खाणे टाळावे. यापदार्थांमध्ये असलेल्या अतिरिक्त साखरेमुळे ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. त्याऐवजी तुम्ही नैसर्गिक ज्यूस अथवा नारळाच्या पाण्याचे सेवन करू शकता. प्रतिकारशक्ती वाढवा : पावसाळ्यात अधिकतर अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे जे व्हिटॅमिन्स आणि इतर पोषकतत्वांनी भरपूर असतील. तसेच जे तुमची प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतील. तसेच डायबिटीजच्या रुग्णांनी पावसाळ्यात नियमितपणे त्यांची शुगर तपासायला हवी.