वेट लॉस सह पोटातील गॅसची समस्या दूर करतो हा काळा पदार्थ
फ्रुट सॅलेड, रायता, तसेच लिंबू पाणी इत्यादी पदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी तुम्ही त्यावर अनेकदा काळ मीठ वापरलं असेल. परंतु काळ मीठ हे केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असते. काळ्या मिठात आयरन, कॅल्शियम, मॅग्नेशियम सारखे अनेक पोषक घटक असतात. हे घटक वजन कमी करण्यासह तुमच्या पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी देखील महत्वाच्या असतात. तेव्हा काळ मिठाचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला कोणता फायदा होतो हे जाणून घेऊयात. अॅसिडिटी पासून सुटका : काळे मिठाचे सेवन केल्याने अॅसिडिटी, गॅस, ब्लोटिंग सारख्या समस्यांपासून सुटका मिळते. एवढंच नाही तर त्याचे नियमित सेवन लिव्हरसाठी देखील फायदेशीर समजले आहे. वजन कमी होत : वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर काळ मीठ फायदेशीर ठरू शकत. काळ्या मिठात असणारे एंटी-ओबेसिटी गुणधर्म लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
डायबिटीज : काळे मीठ हे डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. डायबिटीजच्या रुग्णांना साखर आणि मिठाचे सेवन कमी करायला सांगितले जाते. काळ्या मिठात साधारण मिठाच्या तुलनेत कमी सोडियम असत जे डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी मदत करत. मांसपेशीतील घट्टपणा दूर करतो : काळ्या मिठात असणारे पोटेशियम हे मांसपेशीतील घट्टपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो. परंतु डॉक्टर काळ्या मिठाचे सेवन देखील प्रमाणातच करण्याचा सल्ला देतात. Monsoon Tips : पावसाळ्यात ओली छत्री लवकर कशी सुकवायची? करू नका वेट वापरा या टिप्स ब्लड प्रेशर : काळ मीठ ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर असते. यात असलेले सोडियम क्लोराइड ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरते. जर काळ्या मिठाचे सेवन प्रमाणात केले तर ब्लड प्रेशर नक्कीच कंट्रोलमध्ये राहू शकते.