नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : काही लोक झोपेत बडबड करतात. बडबड करण्याची ही सवय झोपेच्या विकारांचे लक्षण आहे. हा आजार अनेक कारणांमुळे होतो, ज्यामध्ये सर्वात मोठे कारण म्हणजे तणाव, नैराश्य, झोप न लागणे आणि चुकीची जीवनशैली. झोपेच्या विकारांमुळे झोप पूर्ण होत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो. आज ही समस्या जगभरात सामान्य होत चालली आहे. healthline.com च्या अहवालानुसार, यूएस लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोक सात तासांपेक्षा कमी झोप घेतात आणि 70 टक्के हायस्कूल विद्यार्थ्यांना 8 तासांपेक्षा कमी झोप मिळते. हा आकडा आठवड्याच्या दिवसांसाठी आहे. यापैकी बहुतेक लोक तणावग्रस्त असतात. अवेळी झोप लागणे, थकवा येणे, एकाग्रता न लागणे, चिडचिड होणे इत्यादी गोष्टी झोपेच्या विकाराचे नकारात्मक परिणाम म्हणून पाहिले जातात. त्याचा परिणाम लोकांच्या कामाच्या ठिकाणापासून ते नातेसंबंधांवरही दिसून येत (Sleep Disorders) आहे. लक्षणे काय लक्षणांबद्दल बोलायचे झाल्यास, त्याची लक्षणे निद्रानाश, दिवसभर थकवा, विचित्र श्वास घेणे, झोपताना बडबड, अस्वस्थता, कामाच्या ठिकाणी कामावर परिणाम होणे, एकाग्रता न लागणे, नैराश्य आणि अचानक वजन वाढणे ही आहेत. जर ही लक्षणे एक महिन्यापेक्षा जास्त काळ राहत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे वाचा - चिंता वाढली : दक्षिण आफ्रिकेहून पुण्यात आलेल्यांपैकी एक जण Covid पॉझिटिव्ह, 4 जण क्वारंटाईन उपचार काय आहे वैद्यकीय उपचार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर झोपेच्या पद्धतींमध्ये सुधारणा शक्य आहे. याशिवाय जीवनशैलीत बदल करून झोपेची पद्धतही सुधारता येते. जीवनशैलीतील बदलाबद्दल बोलायचे झाल्यास या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हे वाचा - Parag Agrwal Twitter New CEO : इलॉन मस्क यांचं ट्वीट वाचून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल - मिठाई कमी खाणे आणि शक्यतोवर मासे आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करणे. - तुमच्या दिनचर्येत व्यायाम आणि स्ट्रेचिंगचा समावेश करा - झोपण्यापूर्वी पाणी कमी प्या - कॅफिनचे प्रमाण कमी करा, विशेषतः संध्याकाळनंतर - दारू आणि तंबाखूचे सेवन टाळा - रात्रीच्या जेवणात कमी कार्बोहायड्रेटचे सेवन करा - वजन नियंत्रणात ठेवा - झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा