मुंबई, 02 मार्च : अलिकडे तरुणांमध्ये लांब दाढी (Beard) आणि मिशा ठेवण्याचा ट्रेंड (Trend) आहे. दाढी आणि मिशा ठेवल्यानं मुलांचे नेमके वय किती आहे याचा अंदाज येत नाही. तरुण मुले अनेकदा दाढी लवकर वाढवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबताना दिसतात. तुम्हालाही दाढी वाढवायची असेल, तर आहारात काही खास पौष्टिक गोष्टींचा अवश्य समावेश करा. या पौष्टिक गोष्टींचे खाल्ल्याने तुम्ही निरोगी तर राहालच पण दाढीच्या केसांची वाढही करू शकता. दाढीच्या केसांच्या वाढीसाठी तुम्हाला जीवनसत्त्वे, प्रथिने आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिडची गरज असते. या गोष्टींमुळे केवळ दाढी वाढण्यास मदत होत नाही तर ती चमकदार देखील दिसते. जाणून घेऊया दाढी वाढवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा (Diet For Beard Growth) समावेश करावा. टूना मासे तुम्ही जर मांसाहारी असाल तर दाढी वाढवण्यासाठी तुम्ही टूना फिश खाऊ शकता. टूना माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आढळते. टूना फिश खाल्ल्याने त्वचा चमकदार होते आणि केसांची वाढ चांगली होते. त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी टूना फिशचे खायला प्राधान्य द्या. यामुळे केसांची रोमछिद्रे उघडण्यास मदत होते. जर तुम्हाला दाढी वाढवायची असेल तर टूना फिशचा आहारात नक्कीच समावेश करा. मसूर डाळ प्रथिनं योग्य प्रमाणात आहारात घेतल्यानं शरीरासह त्वचा आणि केस निरोगी राहतात. सोयाबीन, पिष्टमय बीन्स आणि मटारमध्ये भरपूर प्रथिनं असतात. तुम्ही शाकाहारी असाल तर दाढी वाढवण्यासाठी तुम्ही मसूर खाऊ शकता. त्यामुळे शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण होते. पालक पालकमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड, कॅल्शियम आणि लोह असे गुणधर्म असतात. आपण अनेकदा पालक करी घरी बनवतो, पालक आपण ज्यूसप्रमाणे पिऊ शकतो. पालक केसांच्या चांगल्या वाढीसाठी उपयुक्त ठरू शकते. शरीरातील लोहाची कमतरता देखील पालकमुळे भरून निघते. पालक केसांना ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. तसेच दाढी वाढण्यास मदत होते. दालचिनी दालचिनी प्रत्येक घरात सहज उपलब्ध असते. बरेच लोक दालचिनी आणि लिंबाची पेस्ट बनवून दाढीवर लावतात, कारण त्यात असलेले मिनरल्स त्वचेची छिद्रे उघडण्यास मदत करतात. याशिवाय दालचिनी आहारात घेण्यामुळेही फायदा होतो. यामुळे केसांच्या मुळांमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त परिसंचरण वाढवण्यास मदत होते. सकाळी कोमट पाणी आणि मधासोबत दालचिनी करता येते. त्यामुळे दाढी वाढण्यास मदत होते. हे वाचा - मास्क घालायलाच नको; सरळ नाकात लावता येईल हा एअर प्युरिफायर, N-95 इतकाच सुरक्षित भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर झिंक असते, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. तुम्हाला भोपळ्याच्या बिया सहज मिळतील. भोपळ्याच्या बिया कोरड्या करून ठेवल्या जाऊ शकतात जेणेकरून आपण त्या कधीही खाऊ शकतो. ते खाल्ल्याने दाढी वाढण्यास मदत होते. हे वाचा - रात्र-रात्रभर झोप येत नाही? ही ट्रिक वापरून 60 सेंकदात व्हाल गुडूप,एकदा करून बघा खोबरेल तेल तुम्हाला दाढी वाढवायची असेल तर जेवणात खोबरेल तेल खायला सुरू करा. खोबरेल तेलाचा वापर केल्याने तुमच्या दाढीची वाढ चांगली होईल. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या दाढीला परफेक्ट लूकही देऊ शकाल. याशिवाय तुम्ही तुमच्या दाढीला खोबरेल तेलाने मसाज करा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)