नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : मासळीचे सेवन आरोग्यासाठी खूप चांगले असते हे आपणा सर्वांना माहीत असेल. पण, तुम्हाला माहीत आहे का, की माशांचे नियमित सेवन मेंदूला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, माशांचे नियमित सेवन मेंदूशी संबंधित आजार (Cerebrovascular disease, or vascular brain disease) दूर ठेवते. मेडिकल न्यूज टुडेच्या मते, सेरेब्रोव्हस्कुलर डिसीज हा एक आजार आहे, ज्यामध्ये मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. याचा मेंदूतील रक्ताभिसरणावर परिणाम होतो. या स्थितीत मेंदूतील स्ट्रोक किंवा इतर गुंतागुंती वाढतात. यासाठी आठवड्यातून दोन दिवसही मासे खाल्ले तर पक्षाघाताचा धोका खूप कमी होऊ (Fish protect brain health) शकतो. अमेरिकेत सध्या पाचपैकी एक मृत्यू मेंदूला रक्त न मिळाल्याने होतो, असे या संशोधनात म्हटले आहे. हे देखील जगातील मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे. मेंदूतील गुंतागुंतीचे आजार हे वाचा - मुंगसासोबतच्या तुंबळ लढाईत गंभीर जखमी झाला कोब्रा; आता जबड्याची होणार सर्जरी अलीकडेच दोन संशोधनांमध्ये हे सिद्ध झालं आहे की, माशांचे नियमित सेवन केल्याने मेंदूच्या गुंतागुंतीशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. एका अभ्यासात असे आढळून आले की जे लोक जास्त मासे खातात त्यांना स्ट्रोकची लक्षणे कमी होती, तर दुसर्या अभ्यासात असे आढळून आले की माशांच्या सेवनाने रक्तवहिन्यासंबंधी मेंदूचे नुकसान होण्याची जोखीम लक्षणीयरित्या कमी होते. सेरेब्रोव्हस्कुलर रोगामुळे अधिक गुंतागुंत निर्माण होते. माशांमध्ये असलेले ओमेगा-३ पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड सेरेब्रोव्हस्कुलर आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. हे वाचा - COVID-19 Vaccination: 31 डिसेंबरपर्यंत सर्वांना नाही मिळणार कोरोना लशीचे दोन्ही डोस पण… मन तंदुरुस्त ठेवण्याचा सोपा मार्ग संशोधनात असं दिसून आलं की जे लोक आठवड्यातून दोनदा किंवा अधिक वेळा मासे खातात त्यांना मेंदूशी संबंधित गुंतागुंतीचे आजार होण्याचा धोका कमी असतो. फ्रान्समधील बोर्डो विद्यापीठातील वरिष्ठ संशोधक आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. सेसिलिया समेरी यांनी सांगितले की, आमचे निष्कर्ष खूप प्रभावी ठरणार आहेत, कारण मेंदूला निरोगी ठेवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. जर तुम्ही आठवड्यातून दोन दिवसही मासे खाल्ले तर तुम्ही ब्रेन स्ट्रोकचा धोका टाळू शकता. वृद्ध लोकांसाठी हे अधिक महत्त्वाचे आहे, कारण या वयात स्मृतिभ्रंशाचा झटका अधिक वाढू लागतो, ही वृद्ध लोकांसाठी एक मोठी समस्या आहे.