JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मुलतानी मातीचा नेहमी वापर करताय? तुम्हाला त्याचे हे दुष्परिणाम माहिती आहेत का?

मुलतानी मातीचा नेहमी वापर करताय? तुम्हाला त्याचे हे दुष्परिणाम माहिती आहेत का?

चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, याचे दुष्परिणामदेखील होऊ शकतात. मुलतानी माती बारीक सिलिकेट आणि अनेक खनिजांपासून बनवली जाते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : मुलतानी मातीचे दुष्परिणाम (Multani Mitti Side Effects) चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, याचे दुष्परिणामदेखील होऊ शकतात. मुलतानी माती बारीक सिलिकेट आणि अनेक खनिजांपासून बनवली जाते. सुंदर त्वचा, गुळगुळीत आणि चमकदार केस मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. काही लोक आम्लीयता/पित्तासारख्या काही आजारांवर उपचार करण्यासाठी मुलतानी मातीचं सेवन करतात (पोटात घेतली जाते). परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असं करणं योग्य नाही. त्यात अॅल्युमिनियम, मॅग्नेशियम आणि सिलिकेट, चिकणमाती खनिजे, शिवाय अतिरिक्त घटकही उच्च दर्जाचे असतात. तरीही ते हानी करू शकते. मुलतानी मातीचे दुष्परिणाम (Side Effects) मुलतानी माती कोरड्या त्वचेसाठी किंवा अत्यंत संवेदनशील त्वचेसाठी चांगली नाही. उच्च शोषक शक्तीमुळे ती आपली त्वचा कोरडी करू शकते. मात्र, कोरड्या त्वचेवर होणारे त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी बदाम आणि दूध मिसळता येतं. त्याऐवजी कोरड्या त्वचेवर काओलीन चिकणमाती वापरून पाहता येईल. हे वाचा -  ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये Mithun Chakraborty ची सून Madalsa sharma ने वाढवला सोशल मीडियाचा पारा मुलतानी मातीच्या फेस पॅकचे दुष्परिणामही समोर आले आहेत. याच्यामुळं सहसा आपली त्वचा कोरडी होते. म्हणजेच, आपल्या त्वचेतील ओलावा कमी होतो, ही बाबही लक्षात घेणं आवश्यक आहे. फुलरच्या चिकणमातीतही उच्च शीतकरण गुणधर्म असतात. यामुळं श्वासोच्छवासाला अडथळा जाणवू शकतो. विशेषतः जेव्हा ही माती उच्च तापासह सनबर्नपासून आराम मिळवण्यासाठी वापरली जाते, तेव्हा हा दुष्परिणाम जाणवू शकतो. हे वाचा -  आधुनिक महिलांना नको असतं मूल, पाश्चिमात्यांचा प्रभाव चिंताजनक; मंत्रीमहोदयांची मुक्ताफळं गर्भधारणेदरम्यान मुलतानी माती खाण्याचे दुष्परिणाम गरोदरपणात मुलतानी माती खाणं सुरक्षित नाही. यामुळे काही गंभीर आरोग्याच्या आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळं आतड्यांना गंभीर नुकसान होऊ शकते. हे बाळाला आणि आईलाही हानी पोहोचवू शकते. म्हणूनच तुम्ही गरोदर असाल तर, मुलतानी माती खाण्यापासून दूर राहणं महत्त्वाचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या