JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Hair Care Tips : केस रुक्ष आणि निस्तेज झालेत? या व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते कारण

Hair Care Tips : केस रुक्ष आणि निस्तेज झालेत? या व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते कारण

तुम्ही जे काही खाता-पिता त्याचा परिणाम तुमच्या केसांवरही होतो. महत्त्वाच्या जीवनसत्त्वांचा आहारात समावेश केल्यास केसांची वाढ योग्य प्रकारे होते. आजकाल लोकांचे केस खूप तुटतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 सप्टेंबर : पौष्टिक पदार्थ खाल्याने शरीराचे सर्व अवयव निरोगी राहतातच. पण त्वचा आणि केस निरोगी राहणे आवश्यक आहे. केस काळे, घट्ट आणि मुळांपासून मजबूत राहण्यासाठी निरोगी आहार घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही जे काही खाता-पिता त्याचा परिणाम तुमच्या केसांवरही होतो. महत्त्वाच्या जीवनसत्त्वांचा आहारात समावेश केल्यास केसांची वाढ योग्य प्रकारे होते. आजकाल लोकांचे केस खूप तुटतात. याची अनेक कारणे असू शकतात. जसे की पोट, आतडे, तणाव, कमकुवत चयापचय इ. कधीकधी केस दोन तोंडी म्हणजेच केसांना फाटे फुटणे, कोरडे केस, निर्जीव केस, कठोर होतात, त्यांच्यामध्ये चमक दिसत नाही, केस अकाली पांढरे होऊ लागतात, अधिक गळणे सुरू होते. शरीरात विशिष्ट जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे देखील हे होऊ शकते. केसांना निरोगी ठेवण्यासाठी अनेक जीवनसत्त्वे आवश्यक असतात आणि त्यांची कमतरता असल्यास सुरु होतात. त्यामुळे शरीरात विशिष्ट प्रकारच्या जीवनसत्त्वांची कमतरता तर नाही ना हे जाणून घेणे महत्वाचे आहे. आज आपण याबद्दल माहिती घेणार आहोत.

पांढरा की लाल; कोणता पेरू अधिक चांगला? रंगाव्यतिरिक्त हा फरकही तुम्हाला माहिती नसेल

संबंधित बातम्या

निस्तेज, कोरडे आणि निर्जीव केस onlymyhealth.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, निस्तेज, कोरड्या केसांसाठी नेहमीच हवामान किंवा हेअर प्रोडक्ट जबाबदार असतात असे नाही, यासाठी शरीरात बायोटिनची कमतरता देखील असू शकते. बायोटिन हे बी व्हिटॅमिन आहे, जे केराटिनच्या उत्पादनात मदत करते. केराटिन हा एक अत्यावश्यक घटक आहे जो केसांच्या पट्ट्या बनवतो. जर शरीरात व्हिटॅमिन बीची कमतरता असेल तर तुमचे केस आणि त्वचा कोरडी होऊ शकते. केस तुटणे किंवा ठिसूळ केस सर्व प्रकारच्या केसांमध्ये काही प्रमाणात ओलावा नसतो. यासह बहुतेक लोकांना केस तुटणे आणि ठिसूळ केसांच्या समस्या असतात. शरीरात झिंक, आयर्न, व्हिटॅमिन बी7 च्या कमतरतेमुळेही केसांमध्ये या समस्या निर्माण होतात हे तुम्हाला माहिती आहे का? त्यांची पूर्तता करण्यासाठी आहारात झिंक, लोह आणि जीवनसत्त्वे B, B7 यांचा समावेश करणे चांगले. हे सर्व पोषक तत्व केस निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहेत.

डोक्यातील कोंडा आणि कोरड्या टाळूची समस्या तुमच्या टाळूवर कोंडा जमा झाला आहे आणि सतत खाज येत आहे का? टाळूला खाज सुटणे, फ्लेक्स हे सूचित करतात की तुमच्या शरीरात ओमेगा फॅटी ऍसिडची कमतरता आहे. स्कॅल्प आणि केसांमध्ये आर्द्रता राखण्यासाठी हे पोषक तत्व खूप महत्वाचे आहे. तसेच व्हिटॅमिन B6 आणि B12 देखील केस आणि टाळूशी संबंधित या समस्यांचे कारण असू शकतात. केस अकाली पांढरे होणे लहान वयात केस पांढरे होणे हे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असल्याचे लक्षण आहे. केसांमधील रंगद्रव्य कमी झाल्यामुळे ते पांढरे होऊ लागतात. हे व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे होते. मात्र, काही लोकांमध्ये वाढत्या वयामुळे, आनुवंशिक कारणांमुळे केस पांढरे होतात. व्हिटॅमिन बी 12 समृध्द अन्न आणि पूरक आहारांद्वारे केस पांढरे होणे टाळता येते. केसगळतीमुळे त्रस्त असाल तर या गोष्टी आहारात घ्या, परिणाम लगेच दिसून येईल केस पातळ होणे आजकाल लोक केस तुटण्याची आणि पातळ होण्याची सर्वात जास्त काळजी करतात. काही लोकांचे केस इतके गळतात की त्यांना लहान वयातच टक्कल दिसू लागते. यामध्ये महिलांसोबतच पुरुषांचाही समावेश आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की एका दिवसात 100 केस तुटणे सामान्य आहे, परंतु जर दररोज जास्त केस तुटत असतील तर आपल्याला आपल्या केसांची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक वेळा आहारात व्हिटॅमिन बी3, बी7, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे केस अधिक गळतात. हे सर्व कोलेजन तयार होण्यास मदत करतात. तरी. आपले केस निरोगी ठेवण्यासाठी आहारात ही जीवनसत्त्वे असलेले पदार्थ घ्या. तसेच केसांना नियमितपणे तेल लावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या