मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पांढरा की लाल; कोणता पेरू अधिक चांगला? रंगाव्यतिरिक्त हा फरकही तुम्हाला माहिती नसेल

पांढरा की लाल; कोणता पेरू अधिक चांगला? रंगाव्यतिरिक्त हा फरकही तुम्हाला माहिती नसेल

पेरूचे अनेक प्रकार आहेत, काही आतून पांढरे असतात तर काही खूप गुलाबी. बर्‍याचदा लोकांच्या मनात असा गोंधळ उडतो की पांढरा आणि गुलाबी पेरूपैकी कोणते जास्त फायदेशीर आहे?

पेरूचे अनेक प्रकार आहेत, काही आतून पांढरे असतात तर काही खूप गुलाबी. बर्‍याचदा लोकांच्या मनात असा गोंधळ उडतो की पांढरा आणि गुलाबी पेरूपैकी कोणते जास्त फायदेशीर आहे?

पेरूचे अनेक प्रकार आहेत, काही आतून पांढरे असतात तर काही खूप गुलाबी. बर्‍याचदा लोकांच्या मनात असा गोंधळ उडतो की पांढरा आणि गुलाबी पेरूपैकी कोणते जास्त फायदेशीर आहे?

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 22 सप्टेंबर : पेरू हे असे एक फळ आहे जे स्वस्त तर आहेच पण सर्वांच्या आवडीचे आहे. पेरू हे चवीला आंबट-गोड असून ते पोटासाठी खूप फायदेशीर फळ आहे. यामध्ये काही पोषक तत्व असतात, जे तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवतात. तज्ज्ञही नेहमी आहारात हंगामी फळांचा समावेश करण्यास सांगतात. पण तुम्ही पाहिलं असेल की फक्त पांढराच नव्हे तर लाल रंगाचेही पेरू असतात. त्यामुळे जेव्हा आरोग्याचा विचार येतो तेव्हा नेमका कोणता पेरू अधिक चांगला असा प्रश्न पडतोच. पेरूचा हंगामही आता येणार आहे, त्यामुळे तुम्ही त्याचे सेवन जरूर करा. मात्र काही लोक पेरूच्या विविधतेबद्दल संभ्रमात राहतात. पांढऱ्या रंगाचे पेरू खाणे जास्त फायदेशीर आहे की लाल हे त्यांना समजत नाही. डायटीशियन शिखा कुमारी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबत महत्त्वाची माहिती दिली असून पेरूचे फायदेही सांगितले आहेत.

केसगळतीमुळे त्रस्त असाल तर या गोष्टी आहारात घ्या, परिणाम लगेच दिसून येईल

पेरूमध्ये असतात हे पोषक तत्व पेरूमध्ये अँटीमाइक्रोबियल, अँटीफंगल, व्हिटॅमिन सी, के, बी6, फोलेट, नियासिन, अँटीडायबेटिक, अतिसारविरोधी, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, जस्त, तांबे, कार्बोहायड्रेट, आहारातील फायबर इत्यादी पोषक तत्व असतात. हे पोटाशी संबंधित समस्या टाळते. पेरू खाल्ल्याने बद्धकोष्ठता सारखी समस्या उद्भवत नाही. आहारातील फायबर असल्याने ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. अशा स्थितीत मधुमेहाच्या रुग्णांनी पेरूचे सेवन अवश्य करावे. पांढऱ्या आणि लाल पेरूमध्ये काय फरक आहे? - डायटीशियन शिखा कुमारी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, लाल पेरूमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. साखर आणि स्टार्च कमी असते. क जीवनसत्व आणि बिया कमी किंवा बियाविरहित असतात. ते पेय म्हणून प्यायल्यास उत्तम. त्याचबरोबर पांढऱ्या पेरूमध्ये साखर, स्टार्च, व्हिटॅमिन सी आणि अधिक बिया असतात. पांढर्‍या पेरूमध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते आणि हे सर्व घटक लाल पेरूमध्ये त्यापेक्षाही अधिक असतात. -लाल पेरूमध्ये कॅरोटीनॉइड नावाचे सेंद्रिय रंगद्रव्य असते. हे रंगद्रव्य गाजर आणि टोमॅटोला लाल रंग देते. कॅरोटीनॉइड्सचे प्रमाण पेरूच्या वेगवेगळ्या जातींनुसार बदलते. यामुले ते पांढरे, हलके लाल ते गडद लाल रंगाचे असतात. त्याच वेळी पांढऱ्या पेरूमध्ये कॅरोटीनॉइड खूपच कमी असते त्यामुळे त्याला रंग येत नाही. तसेच पांढऱ्या आणि गुलाबी पेरूच्या चवीतही थोडा फरक असतो. - ही संयुगे फळे आणि भाज्यांना लाल, केशरी, पिवळा रंग देतात. कॅरोटीनोइड्स आणि पॉलिफेनॉल ही संयुगे आहेत, जी पेरूला लाल रंग देतात. दुसरीकडे पांढऱ्या पेरूमध्ये पुरेसे कॅरोटीनोइड्स आणि पॉलिफेनॉल नसतात.
पेरू खाण्याचे आरोग्य फायदे - रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते. - हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते. - मासिक पाळीदरम्यान होणारे क्रॅम्प्स, पोटदुखी इत्यादीपासून आराम मिळतो. - पचनसंस्थेसाठी खूप चांगले. . - वजन कमी करण्यात प्रभावी ठरू शकते. - कॅन्सरविरोधी घटक असतात. - रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. - पेरू खाल्ल्याने त्वचेचे आरोग्य चांगले राहते. जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करणे योग्य आहे का? पाहा आरोग्यावर कसा होतो परिणाम पेरूचे सेवन कसे करावे पेरू कापून त्यावर मीठ टाकून तुम्ही ते खाऊ शकता. हे फळांसह तयार केलेल्या सॅलडमध्ये देखील टाकले जाऊ शकते. यासोबतच पेरूचा रस, स्मूदीही बनवून पिया येते. या फळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवते.
First published:

Tags: Fruit, Health, Health Tips, Lifestyle

पुढील बातम्या