जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / केसगळतीमुळे त्रस्त असाल तर या गोष्टी आहारात घ्या, परिणाम लगेच दिसून येईल

केसगळतीमुळे त्रस्त असाल तर या गोष्टी आहारात घ्या, परिणाम लगेच दिसून येईल

केसगळतीमुळे त्रस्त असाल तर या गोष्टी आहारात घ्या, परिणाम लगेच दिसून येईल

झिंक हे आपल्या शरीरासाठी आवश्यक खनिज आहे. शरीरातील सुमारे 300 प्रकारच्या एन्झाईम्सच्या कार्यासाठी झिंक जबाबदार आहे.त्यामुळे झिंकची कमतरता समजून घेणे आवश्यक आहे. झिंकच्या कमतरतेमुळेही केस गळू शकतात. त्याच्या कमतरतेमुळे चव आणि वास कमी होतो आणि प्रजननक्षमतेवरही परिणाम होतो.

  • -MIN READ Lanja,Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : निरोगी आयुष्यासाठी शरीरातील सर्व पोषक तत्वांचा समतोल राखणे आवश्यक आहे. झिंक हे असेच एक खनिज आहे, जे आपल्या शरीरातील अनेक कार्यांसाठी जबाबदार आहे. हेल्थलाइन च्या बातमीनुसार, शरीरातील सुमारे 300 प्रकारच्या एन्झाईम्सच्या कार्यासाठी झिंक हे आवश्यक खनिज आहे. झिंक शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवते आणि कोणत्याही प्रकारच्या संसर्गाच्या वेळी शरीराचे संरक्षण करते. हे शरीरातील खराब झालेल्या ऊतकांची दुरुस्ती देखील करते. डीएनएसाठीही झिंक आवश्यक आहे. त्यामुळे झिंकची कमतरता समजून घेणे महत्त्वाचे आहे. झिंकच्या कमतरतेमुळेही केस गळू शकतात. त्याच्या कमतरतेमुळे चव आणि वास कमी होतो आणि प्रजननक्षमतेवरही परिणाम होतो. अहवालानुसार, निरोगी पुरुषाने आपल्या आहारात दररोज 11 मिलीग्राम झिंकचे सेवन केले पाहिजे, तर महिलांनी दररोज 8 मिलीग्राम झिंकचे सेवन केले पाहिजे. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते किंवा स्तनपान करते तेव्हा तिला दररोज 12 मिलीग्राम झिंकची आवश्यकता असते. झिंकच्या कमतरतेची लक्षणे - शरीरात झिंकच्या कमतरतेमुळे कोणतेही कारण नसताना वजन कमी होऊ लागते, त्यामुळे अशक्तपणा जाणवतो. झिंकच्या कमतरतेमुळे भूक मंदावते. केस गळायला लागतात. त्याचा मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. एकाग्रतेचा अभाव निर्माण होतो. झिंकच्या कमतरतेमुळे लवकर जखम बरी होत नाही. झिंकच्या कमतरतेमुळे अतिसार होऊ शकतो. त्वचेवर जखमा दिसतात. झिंकच्या कमतरतेवर उपाय - शेंगांची भाजी: झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी शेंग वर्गीय भाज्यांचे सेवन अधिक करावे. यासाठी छोले, डाळी आणि तूर डाळ, सोयाबीन इत्यादींचे सेवन करावे. या सर्वांमध्ये झिंक मुबलक प्रमाणात आढळते. हे वाचा -  ऑनलाइन फसवणूक, वीजबिल, बँकेचं काम, प्रॉपर्टी वाद, घरगुती भांडण.. कायदेशीर उत्तर तीळ, भोपळ्याच्या बिया इ. बियांमध्येही झिंक मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय या गोष्टींमध्ये भरपूर फायबर असते. या गोष्टींच्या सेवनाने झिंकची कमतरता पूर्ण होते. मशरूम : झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात मशरूमचा समावेश करणे चांगले. मशरूम कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि प्रोटीनसह झिंकची कमतरता पूर्ण करते. हे वाचा -  जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करणे योग्य आहे का? पाहा आरोग्यावर कसा होतो परिणाम शेंगदाणे : शेंगदाण्यामध्ये लोह, पोटॅशियम, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम इत्यादी घटकांसह झिंक देखील असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात