फोटो सौजन्य - Canva
लुसाका, 30 ऑक्टोबर : पहिली भेट, मग ओळख, मग मैत्री आणि मग प्रेम… तरुण-तरुणींमधील नातं (Relationship) असं फुलत जातं. एक वेळ अशी येते जिथं आपल्या जोडीदाराने आपल्याला प्रपोज करावं असं बहुतेक तरुणींना वाटतं. त्याच क्षणाची एक तरुणी तब्बल आठ वर्षे आतुरतेने वाट पाहत होती (8 Years Long Relationship). पण इतक्या वर्षांच्या रिलेशनशिपनंतरही तिच्या बॉयफ्रेंडने (Boyfriend) काही तिला प्रपोज केलं नाही. अखेर संतप्त झालेल्या गर्लफ्रेंडने (Girlfriend) त्याला कोर्टातच खेचलं (Girlfriend Sues Her Boyfriend). झाम्बियातील (Zambia) 26 वर्षांची जेरट्रुड नगोमा (Gertrude Ngoma) ही तरुणी तिचा बॉयफ्रेंड हरबर्ट सलाइकी ( Herbert Salaliki) प्रपोज करत नाही म्हणून कोर्टात पोहोचली. आपल्या बॉयफ्रेंडविरोधात तिने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. सोशल मीडियावर या तरुणीने आपली व्यथा मांडली आहे. गेल्या आठ वर्षांपासन दोघंही एकमेकांना डेट करत होते. ते शारीरिकरित्याही जवळ आले होते. त्यांना एक मुलगाही आहे. नगोमा गेल्या काही वर्षांपासून हरबर्ट तिला अंगठीसह लग्नाची मागणी घालेल याची प्रतीक्षा करत होती. वाट पाहून पाहून ती थकली. पण अद्यापही त्याने तिला लग्नाची मागणी घातली नाही. त्यामुळे प्रियकरावर तिला संशय वाटतो आहे. त्यामुळे तिने त्याच्याविरोधात असं पाऊल उचललं. तिने कोर्टात जाण्याचं ठरवलं. हे वाचा - हॉटेल, ट्रॅव्हल कंपनीमुळे हनीमूनची लागली वाट; संतप्त कपलने घेतला सॉलिड बदला नगोमाने बॉयफ्रेंडवर तिचा वेळ वाया घालवल्याचा आरोप केला आहे. तिने कोर्टात सांगितलं, तिच्या मुलाचा मुलगा नात्याबाबत गंभीर नाही. झाम्बियातील प्रथेनुसार हरबर्टने नगोमाच्या कुटुंबाला हुंड्याचे पैसे दिले आहे. तरीसुद्धा त्याने साखरपुड्याची अंगठी खरेदी केली नाही. त्यामुळेच तिला आता चिंता वाटू लागली आहे. तिला आता आपलं भविष्य अंधारात दिसतं आहे. तर हरबर्टने आपण आर्थिकरित्या स्थिर नसल्याने लग्न करत नसल्याचं कारण दिलं. हे वाचा - ‘या’राशीच्या लोकांना प्रेमासाठी करावा लागतो संघर्ष; जाणून घ्या कारणे दोघांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने दोघांनाही आपसात बोलण्यास सांगितलं आहे.