चंदीगड, 29 ऑक्टोबर : लग्नानंतर नवदाम्पत्यासाठी (Newly married couple) सर्वात महत्त्वाचा क्षण असतो तो हनीमून (Honeymoon). आपलं हनीमून अविस्मरणीय असावं यासाठी किती तरी कपल लग्नाआधीपासूनच प्लॅनिंग करतात (Honeymoon package). हनीमूनचं ठिकाण, हॉटेल ठरवून ठेवतात. ज्या क्षणाची त्यांनी इतकी तयारी केलेली असती, ज्याची ते आतुरतेने वाट पाहत असतात तो क्षण आला त्याची वाट लागली तर साहजिकच कोणतंही कपल संतप्त होणारच. एका कपलच्याही हनीमूनची वाट लागली आणि संतप्त झालेल्या या कपलने त्याचा बदलाही घेतला. दोन नवदाम्पत्य एका ट्रॅव्हल कंपनीमार्फत हनीमूनचं पॅकेज घेतलं होतं. त्या मनालीतील एक हॉटेल बुक केलं होतं. पण बुकिंग करताना जे जे काही सांगण्यात आलं, दाखवण्यात आलं तसं काहीच हॉटेलमध्ये प्रत्यक्षात नव्हतं. त्यामुळे हे कपल निराश झालं. त्यानंतर ट्रॅव्हल कंपनी आणि हॉटेलकडे तक्रार करूनही त्यांनी दखल घेतली नाही. अखेर संतप्त झालेल्या या कपलने त्यांच्याविरोधात चंदीगढ ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे तक्रार केली. हे वाचा - 2 बायकांची हौस पुरवता पुरवता नवऱ्याचे झाले हाल; अखेर उचचलं धक्कादायक पाऊल दाम्पत्याने आरोप केला की, त्यांनी ट्रॅव्हल टॉकीज कंपनीच्या माध्यमातून हनीमून पॅकेज बुक केलं होतं. 15 डिसेंबर 2020 रोजी मनातील हॉटेल द हमसौर व्हूचं बुकिंग करण्यात आलं. त्याच दिवशी त्यांनी बुकिंगचे 10,302 रुपयेही दिले. चार जणांसाठी दोन रूम बुक केल्या. ट्रॅव्हल फर्मने त्यांना बाल्कनी दृश्य आणि हॉटेलचे काही सुंदर फोटोही दाखवले. जेव्हा ते लोक या हॉटेलमध्ये गेले तेव्हा त्यांना आपल्या रूममध्ये कोणतीच सुविधा मिळाली नाही जी त्यांना बुकिंग करताना दाखवण्यात आली होती. त्यांनी ट्रॅव्हल कंपनीकडे याची तक्रार केली. पण त्यांनी दखल घेतली नाही. शिवाय बुकिंगदरम्यान आश्वास्त केल्यानुसार हॉटेलनेही रूम बदलून देण्यास नकार दिला. शेवटी या दाम्पत्यांनी हॉटेल सोडून दुसऱ्या हॉटेलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिथं पोहोचण्यासाठी 95,00 रुपये खर्च आणि हॉटेलमध्ये दोन रात्र राहण्यासाठी 18,000 हजार रुपये मोजावे लागले. हे वाचा - महिलांनाही झोपेत Orgasm प्राप्त होतो?, हे आहे त्यामागचं कारण दाम्पत्याने हॉटेल आणि ट्रॅव्हल कंपनीला असंच सोडलं नाही. ग्राहक विवाद निवारण आयोगात त्यांनी तक्रार केली. आयोगाने ट्रॅव्हल फर्म आणि हॉटेल मालकाला हजर राहण्याचे आदेश दिले पण ते आले नाही. तक्रारदाराने हॉटेलचे फोटो पाहूनच हॉटेल बुक केलं होतं. पण जसं त्यांना आश्वासित करण्यात आलं, तशी सुविधा न मिळाल्याने हनीमूनच्या आनंदाला विरजण लागलं. हे आयोगाच्या निदर्शनास आलं. त्यानंतर आयोगाने ट्रॅव्हल फर्म आणि हॉटेल मालकाला तक्रारदारांचे पैसे त्यांना परत करण्याचे शिवाय असुविधा सहन करावी लागल्याने त्याची भरपाई देण्याचेही आदेश दिले. आयोगाने दोघांनीही तक्रारदारांना 27,302 रुपये देण्याचे आदेश दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.