JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Pune News : हा डोसा आहे की पिझ्झा? पुण्यातील आगळा वेगळा चीज कॉर्न डोसा, पाहा Video

Pune News : हा डोसा आहे की पिझ्झा? पुण्यातील आगळा वेगळा चीज कॉर्न डोसा, पाहा Video

युनिक कॉम्बिनेशन असणारा चीज कॉर्न डोसा पुण्यात मिळत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 8 जुलै : पिझ्झा विशेषतः लहान मुलांचा आवडता पदार्थ आहे. पण हे जंक फूड रिफाइंड पिठाचे बनलेले असल्याने त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे पुण्यात चक्क  हेल्थी डोसा कम पिझ्झा मिळत आहे. डोसा कम पिझ्झा असे युनिक कॉम्बिनेशन असणारा हा चीज कॉर्न डोसा आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात असणार्‍या फूड लॅण्ड याठिकाणी आगळावेगळा डोसा आपल्याला खायला मिळेल.  जो की अगदी पिझ्झा सारखा दिसणारा आणि मसाला डोसामध्ये हलकी पिझ्झाची चव देणारा डोसा आहे. चीज कॉर्न डोसा स्पेशल डिश फूड लॅण्डचे मालक मंगेश खवले आहेत. फूड लॅण्ड हे हॉटेल जवळपास दोन वर्षे झाले कार्यरत आहे. कोथरूड मधील एमआयटी कॉलेज परिसरामध्ये कॉलेज स्टूडेंट्सला पॉकेट फ्रेंडली दरामध्ये पदार्थ देण्यासाठी मंगेश यांनी हे हॉटेल सुरू केलेले आहे. या ठिकाणी नॉर्थ इंडियन, साउथ इंडियन, पंजाबी थाळी अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मिळतात. या ठिकाणी पुणेकरांना वेगळं काही ट्राय करायचं असेल तर चीज कॉर्न डोसा ही यांची स्पेशल डिश आहे.  

चीज कॉर्न डोसा हा आमचा स्पेशल मेनू आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चीज कॉर्न एक स्पेशल मसाला असतो. ज्याप्रमाणे पिझ्झा बेसला पाहिले फर्स्ट प्लेयर एक लाल कलरची चटणी लावली जाते. त्याप्रमाणे या डोसालाही विशिष्ट प्रकारची एक लाल चटणी लावली जाते आणि एक स्पेशल ऑथेंटिक साउथ इंडियन मसाला असतो. तो त्याच्यावर लावला जातो. असा चीज कॉर्न डोसा लोकांना खायला मिळतो आणि आपले जे शेफ होते, त्यांना घेऊन आपण एक स्पेशल मेनू म्हणून हा डोसा तयार केलेला आहे. हे शेफ स्पेशल साऊथवरून बोलावले, असं मंगेश सांगतात. काय आहे किंमत? चीज डोसा, कट डोसा, लोणी स्पंज डोसा अशा डोसांच्या प्रकारामध्ये चीज कॉर्न डोसा ही लोकांची पसंती ठरत आहे. चीज कॉर्न डोसा याची किंमत 120 रुपये इतकी आहे. त्याची किंमत 120 रुपये असण्याचे कारण म्हणजे डोसावर भरमसाठ चीज टाकले जाते. त्याचबरोबर भरपूर प्रमाणात बटरचाही वापर केला जातो. डोसा बनवण्याचे मसाले याची कॉस्टिंग जास्त जाते. त्यामुळे याची किंमत 120 रुपये असल्याचे मंगेश सांगतात.

Pune News : काय भडंग, काय कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला, सांगलीची भेळ एकदम ओक्केच!

संबंधित बातम्या

आगळावेगळा चीज कॉर्न डोसा  जी रेड कलरची चटणी या डोसामध्ये वापरली जाते त्याने या डोसाला पिझ्झाची स्मेल येतो. त्यामुळे डोसाला पिझ्झासारखा वास, थोड्या प्रमाणात टेस्ट मिळते.  चीज कॉर्न पिझ्झामध्ये जे कोण असतात ते उकडून घेतले जातात. त्याचबरोबर उकडल्यानंतर ते एका मसाल्यामध्ये फ्राय केले जातात आणि मग ते डोस्यावर ऍड केले जातात. पिझ्झा बनवताना जी चटणी वापरली जाते त्याच प्रकारची चटणी या डोस्यात वापरली जाते. भरमसाठ चीज त्यावर टाकले जाते आणि अशा प्रकारे डोसा कम पिझ्झा असा आगळावेगळा चीज कॉर्न डोसा लोकांना सर्व्ह केला जातो, असंही मंगेश यांनी सांगितले. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या