प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे 27 जून : भेळ-पाणीपुरी हे चाटचे पदार्थ अनेकांना आवडतात. खवय्यांचं शहर असलेल्या पुण्यातील वेगवेगळ्या भागात चाटचे स्टॉल फेमस आहेत. त्या स्टॉलवर नेहमी गर्दी असते. चाट स्टॉलच्या वाढत्या स्पर्धेत काहीतरी वेगळं देण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पुण्यात सध्या सांगली स्पेशल भेळ-पाणीपुरी हा विशेष प्रकार मिळतो. अप्रतिम चव असलेल्या सांगली भेळ पाणीपुरीला पुणेकरांनी पसंती दिलीय. कशी आहे सांगली भेळ-पाणीपुरी? सुरेश तानाजी शिंदे यांनी सांगली भेळ पाणीपुरीची सुरुवात 2005 साली केली. सांगलीची अस्सल वैशिष्ट्य असलेली भेळ आणि पाणीपुरी एकत्र करून हा पदार्थ तयार केला जातो, असं शिंदे यांनी सांगितलं. ही भेळ बनवण्याची पद्धतही त्यांनी सांगितली.
‘या भेळमध्ये नेहमीच्या मुरमुऱ्यांच्या ऐवजी भडंग वापरण्यात येतो. कोल्हापुरा कांदा-लसूण-हिरवी आणि लाल मिरची मसाला घालून ही मसालेदार भेळ बनवतात. या भेळवर शेव, ताजी चिरलेली कोथिंबीर, कांदा देखील टाकला जातो. याचं वैशिष्ट्य म्हणजे ओव्हरलोड केलेल्या भेळच्या डिशमध्ये तुम्हाला वर भेळ दिसेल. पण, त्याखाली चटकदार पाणीपुरी देखील ठेवलेली असते. 5-6 पाणीपुऱ्या यामध्ये ठेवलेलेल्या असतात,’ अशी माहिती शिंदे यांनी दिली. पंतांचा वडा डोसा कसा झाला फेमस? पाहा पदवीधर वडेवाल्याची कहाणी सांगली भेळ पाणीपुरीसह शेव पुरी , रगडा पुरी , कचोरी/समोसा चाट आणि एसपीडीपी देखील इथं मिळतात. या चविष्ट भेळची किम्मत पन्नास रुपये इतकी आहे. त्याचबरोबर ही भेळ पुरेशा क्वांटिटीमध्ये येते. त्यामुळे एका प्लेटमध्ये तुमचं पोट भरते.