JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / बाहेर मस्त पाऊस, गरमा गरम पुरणपोळी आणि मोदक समोर आला तर, एकदा पाहाच हा Video

बाहेर मस्त पाऊस, गरमा गरम पुरणपोळी आणि मोदक समोर आला तर, एकदा पाहाच हा Video

पुण्यातील खाद्य संस्कृती ही जगात नावाजली जाते. पुण्यातील कॅफेमध्ये आता पुरणपोळी आणि मोदक मिळत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 29 जुलै : पुण्याचा गणेशोत्सव, पर्यटन स्थळ, पुण्यातील पुणेरी पाट्या जगप्रसिद्ध आहेत. तशीच पुण्यातील खाद्य संस्कृती ही जगात नावाजली जाते. पुणेकर खावये असल्याने त्यांच्या आवडीचे पदार्थ ही त्याच पद्धतीचे असतात. पण तुम्ही कधी ऐकलं का कॅफेमध्ये मिळणारी पुरणपोळी आणि मोदक नाही ना? पण पुण्यातील एका कॅफेमध्ये हे पदार्थ मिळत आहेत. पुण्यातील सदाशिव पेठेत राहणाऱ्या विशाल खोपकर तरुणाने कॅफे 30 सुरु केला आहे. यामध्ये चक्क पिझ्झा, बर्गर ते पुरणपोळी, मोदक अशी मेजवानी त्याने खवय्यांना चखायला दिली आहे. या सोबतच असे अनेक पदार्थ ही तुम्हाला चाखायला मिळतात.

थीम काय आहे? या कॅफेमध्ये गेल्या वर तुम्हाला पुण्याच्या संस्कृतीचे दर्शन घडते. तसेच पुणेरी पाट्या पेठेतील संस्कृती पहिला मिळते. महाराष्ट्र ते इटालियन असे पदार्थ मेनू कार्डमध्ये पाहायला मिळतात. तसेच लोकांना इंगेज करण्यासाठी काही गेम देखील ठेवलेले आहेत. कुचंबक मॅक्झिन सापसीडी बुद्धिबळ असे विविध खेळ यामध्ये आहेत. कुठले पदार्थ मिळतात? या कॅफमध्ये तुम्हाला पिझ्झा, बर्गर, पुरणपोळी, मोदक, थालीपीठ, आळुवडी, कोथिंबीर वडी, वडापाव, चहा चपाती, मिसळ, व्हाईट सॉस पास्ता असे खूप सारे पदार्थ तुम्हांला या कॅफेमध्ये टेस्ट करायला मिळतात.

कधी चॅाकलेट मोमो खाल्लाय का? एक नव्हे आहेत 50 प्रकार, पुण्यातला पाहा हा VIDEO

संबंधित बातम्या

कधी झाली सुरुवात? 2020 मध्ये या कॅफेला सुरुवात केली. हे सुरू करण्या मागचं कारण हेच आहे की अनेक देश फिरलो आणि तिथे ही लोकांना महाराष्ट्रीयन फूड खायला आवडत. तिथे काही महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट होते. यांनी हे पाहूनच मी इन्स्पायर होऊन कॅफे 30 सुरु केलं. आमच्या कॅफेमध्ये महाराष्ट्रीयन ते इटालियन असे सगळेच पदार्थ नमेनू कार्डमध्ये पाहायला मिळतात आणि आमच्या या कॅफेमध्ये अनेक कलाकार रील स्टार देखील येत असतात, असं कॅफेचे मालक विशाल खोपकर यांनी सांगितलं. कुठे आहे हा कॅफे? कर्वे रोड करिश्मा अपार्टमेंटच्या पुढे कॉर्नरला व्हेज किमया रेस्टॉरंटच्या शेजारी कॅफे 30 पहिला मिळेल. वेळ सकाळी 10.30 ते रात्री 11.30 पर्यंत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या