जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कधी चॅाकलेट मोमो खाल्लाय का? एक नव्हे आहेत 50 प्रकार, पुण्यातला पाहा हा VIDEO

कधी चॅाकलेट मोमो खाल्लाय का? एक नव्हे आहेत 50 प्रकार, पुण्यातला पाहा हा VIDEO

कधी चॅाकलेट मोमो खाल्लाय का? एक नव्हे आहेत 50 प्रकार, पुण्यातला पाहा हा VIDEO

पुण्यातील या ठिकाणी चक्क 50 पेक्षा जास्त मोमोजचे प्रकार खायला मिळतील.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 25 जुलै : मोमोज म्हटलं की कुणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही. त्यामध्ये आपल्याला स्ट्रीम, फ्राईड, कुरकुरे अशीच नावे माहिती आहेत. पण पुण्यातील या एका कॅफेमध्ये तुम्हाला चक्क 50 पेक्षा जास्त मोमोजचे प्रकार खायला मिळतील. कोणत्या कॅफेमध्ये मिळतील 50 पेक्षा जास्त  मोमोजचे प्रकार? मोमोजचे कुठले प्रकार आहेत या कॅफेमध्ये उपलब्ध? या मोमोजची किंमत काय आहे याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. कोणत्या प्रकारचे मिळतात मोमोज? पुण्यातील मोमो नेशन कॅफेमध्ये तुम्हाला 50 पेक्षा जास्त मोमोजचे प्रकार खायला मिळतील. या कॅफेचे मालक यशवंत वाणी आहेत. या ठिकाणी मोमोजमध्ये तुम्हाला शेजवान स्ट्रीम, व्हेज तंदुरी, क्रिस्पी, व्हेज चिली, कॉकटेल, व्हेज कढई, अफगाणि, आचारी, व्हाईट सॉस,रेड सॉस, चिझ फ्राईड, मिक्स सॉस, चॉकलेट मोमोज असे 50 पेक्षा जास्त मोमोजचे प्रकार खायला मिळतील. हे मोमोज दिसायला जेवढे छान दिसतायत तेवढंच खायला देखील टेस्टी आहेत. त्यामुळे जर तुम्हाला हे मोमोजचे नवं नवीन प्रकार टेस्ट करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकतात.

News18लोकमत
News18लोकमत

मोमोजची किंमत काय? पुण्यामध्ये गेल्या 3 वर्षा पासून ही मोमो नेशन कॅफेची ब्रँच आहे. तसेच महाराष्ट्रात 80 पेक्षा जास्त आउटलेट आहेत. आमच्या इथं तुम्हाला खूप सारे नवं नवीन मोमोज खायला मिळतील. ह्या मोमोजची स्टार्टींग किंमत 119 रुपये पासून ते 169 पर्यंत आहे. आमच्या कॅफेला लोकांचा देखील खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जर कधी तुम्हाला वेगळं प्रकार ट्राय करायचा असेल तर आमच्या मोमो नेशन कॅफेला नक्की येऊ शकता, असं कॅफेचे मालक यशवंत वाणी यांनी सांगितलं. null कुठे आहे हे कॅफे? पुण्यातील सर्वांचं आकर्षण असलेलं एफ. सी रोड वरील विनर विंडो अपार्टमेंट, वैशाली हॉटेलच्या मागे हा मोमो नेशन कॅफे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात