नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 28 फेब्रुवारी : इडली, डोसा, वडा-सांबार हे दक्षिण भारतीय पदार्थ आता अगदी आपले वाटावे इतके महाराष्ट्रात रुळले आहेत. जालन्यातही एका पेक्षा एक भन्नाट आणि स्वादिष्ट पदार्थ खवय्यांना खाण्यासाठी मिळतात. त्यातील एक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मिळणारा लोणी स्पंज डोसा खवय्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या ठिकाणी लोणी स्पंज डोसा खाण्यासाठी खवय्यांची नेहमीच गर्दी होत असते. काय आहे डोस्याची खासियत? गजानन अकात यांनी 2011 मध्ये श्री कानिफनाथ दावणगिरी या नावाने आपली लोणी स्पंज डोस्याची गाडी सुरु केली. त्यांनी बनवलेला लोणी स्पंज डोसा खवय्यांच्या पसंतीस उतरला आहे. डोस्याबरोबर शेंगदाणा चटणी आणि बटाट्याची भाजी देखील खवय्यांना दिली जाते. हा डोसा लोणी टाकून तयार केला जातो. यामुळे डोस्याची चव आणखीचं वाढते. हीच या डोस्याची खासियत आहे, असं गजानन अकात सांगतात.
कसा बनवला जातो लोणी स्पंज डोसा? लोणी स्पंज डोसा बनवण्यासाठी खास कोलम तांदूळ वापरले जातात. तसेच बटाट्याची भाजी, शेंगदाणा चटणी, खोबरं चटणी देखील खास पद्धतीने बनवली जाते. तयार करताना टाकण्यात येणारे लोणी या डोस्याच्या चवीत भर घालते. कोणत्या कोणत्या प्रकारचा डोसा मिळतो? लोणी स्पंज डोसा, मसाला डोसा, शेजवान डोसा, प्लेन डोसा या प्रकारचा डोसा श्री कानिफनाथ दावणगिरी या गाडीवर मिळतो. सकाळी आठ वाजताच त्यांची गाडी खवय्यांच्या सेवेत असते. दुपारी चार वाजेपर्यंत इथे खवय्यांची मोठी गर्दी असते. पार्सलची सुविधा देखील इथे उपलब्ध आहे. या डोस्याची किंमत 30 रुपये आहे. खवय्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे अकात यांचा दररोजचा टर्न ओव्हर 10 हजार एव्हढा आहे.
चिकन शोरमा खावा तर इथंच! पाहा कशी तयार होते औरंगाबादची फेमस डिश, Video
चव एकदम छान इथे मिळणारा हा जो डोसा आहे. असा डोसा मी कुठेच खाल्ला नाही. यामध्ये जी भाजी आणि चटणी आहे ती अतिशय उत्तम आहे. चव पण एकदम छान आहे, असं खवय्ये कृष्णानंद पंडित सांगतात. कुठे खाल लोणी स्पंज डोसा? छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर जालना