सुशील राऊत, औरंगाबाद औरंगाबाद, 20 फेब्रुवारी : चिकन पासून बनवलेले पदार्थ कोणाला आवडत नाहीत. असे खूप लोग असतात चिकन पासून बनवलेले पदार्थ खाण्यासाठी वेडे असतात. तुम्ही सुद्धा आतापर्यंत चिकन पासून बनवलेले चिकन कंटकी, चिकन रोल यासारखे पदार्थ खाल्ले असतील. मात्र, तुम्ही चिकन पासून तयार होणारा चिकन शोरमा हा पदार्थ खाल्लाय का? औरंगाबाद मध्ये मिळणारा प्रसिद्ध चिकन शोरमा हा पदार्थ औरंगाबादकरांना भुरळ घालत आहे. औरंगाबाद शहरामध्ये बुडी लेन भागात प्रसिद्ध चिकन शोरमा हा पदार्थ मिळतो. करीम खान यांची बुडी लेन भागात दुकान आहे. करीम खान सांगतात की, आम्ही पूर्वी मुंबई, दिल्ली या ठिकाणी चायनीज आणि इतर खाद्यपदार्थांची दुकाने चालवत होतो. त्यानंतर आम्हाला वाटले की आम्ही औरंगाबादकरांसाठी काही वेगळं सुरु करावं आणि त्यासाठी आम्ही चिकन शोरमा हा पदार्थ सुरु केला.
काय साहित्य लागतं? दही,मीठ, मिरची, हळद, चिकनचे पीस, गव्हाची मैद्याची पोळी, आलूचे चिप्स, पत्ता गोबी आणि टोमॅटो सॉस पदार्थ लागतात. कसा बनवला जातो चिकन शोरमा? चिकन शोरमा बनवण्यासाठी सुरुवातीला चिकनचे पीस घ्यावे लागातात. त्याला स्वच्छ धुऊन त्याच्यामध्ये मसाले टाकावे लागतात. हळद, मिरची,मीठ, दही हे टाकल्यानंतर ते एका लोखंडी रॉडला जोडावे लागतात. त्यानंतर तो लोखंडी रॉड गॅसच्या शेगडीला उभा लावावा लागतो. तो रॉड गोल फिरत असतो आणि शेगडीच्या गॅस समोर येत असतो. हा संपूर्ण चिकनचा रॉड लाल झाल्यानंतर तो तयार झाला असे समजून त्यानंतर त्याला कट करून पोळीवरती मेव्हणीजलावून पत्ता गोबी चिप्स इत्यादी पदार्थ टाकावे लागतात. त्यानंतर त्याला पोळी मध्ये रोल करून घ्यावे लागते.
तुघलकाच्या काळापासून फेमस असलेली औरंगाबादची नान रोटी कशी बनते, पाहा Video
किती आहे किंमत? औरंगाबाद शहरामध्ये बुडी लेन भागामध्ये हा पदार्थ मिळतो. या चिकन शोरमाची किंमत 60 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - 9511292800